पुणे

खर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात साकारणार कै. लालखा पंजाबी यांचे तैल चित्र

CD

KRA26A02542
खर्डा ः स्व. लालखा अहमदखा पंजाबी यांच्या स्मृतीदिनानिमित्त प्रतिमा पूजन प्रसंगी फिरोज पंजाबी, डॉ. ओंकार जाधव, डॉ. प्रमिला गुंड, विजयसिंह गोलेकर आदी.

आरोग्य केंद्रात साकारणार
लालखा पंजाबींचे तैल चित्र
खर्डा, ता. १८ ः कोट्यवधी रुपयांची दोन एकर जमीन १९७८ साली आरोग्य केंद्रासाठी स्व. लालखा अहमदखा पंजाबी यांनी दान केली होती. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त प्रतिमेचे पूजन व सामाजिक कार्याचा उजाळा देण्यात आला.
यावेळी खर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांचे लवकरच तैल चित्र साकारण्यात येणार आहे. समाजात एक वेगळा आदर्श निर्माण व्हावा, त्यांच्या प्रेरणेने समाजातील अनेक दानशूर व्यक्ती पुढे येऊन समाजहिताचे निर्णय घेतील, हा त्या मागचा उद्देश असल्याची प्रतिक्रिया बाळासाहेब शिंदे यांनी व्यक्त केली.
१९७८ मध्ये खर्डा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाले. मात्र, त्याकाळी जागेचा बिकट प्रश्‍न निर्माण झाला होता. ही बाब लक्षात घेऊन स्व. लालखा अहमदखा पंजाबी व त्यांच्या पत्नी स्व. फातिमाबी पंजाबी यांनी दूरदृष्टी दाखवत रस्त्यालगतची दोन एकर जागा विकत घेऊन ती शासनाला मोफत दान केली. आज येथे सहा कोटी रुपये खर्चाची सुसज्ज नवी इमारत उभी राहिली आहे. पंजाबी यांच्या त्या काळातील निर्णयांचे मूर्त स्वरूप आज पहायला मिळत आहे.
स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात फिरोज पंजाबी, पीएसआय अशोक खेडकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. ओंकार जाधव, डॉ. प्रमिला गुंड, विजयसिंह गोलेकर, डॉ. बिपिन लाड, फिरोज पंजाबी, महालिंग कोरे, डॉ. सोपान गोपाळघरे, दीपक जावळे, शकूर कुरेशी, शहाबाज सय्यद, मुजीब आतार, राजू सय्यद, युसूफ बागवान आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टात घमासान! ठाकरेंच्या वकिलांनी थेट शिंदेंच्या आमदारकीवरच बोट ठेवलं, सिब्बल यांचा सर्वात मोठा युक्तिवाद

Mangalagaur 2026 : नववधू मंगळागौर का साजरी करतात? जाणून घ्या महत्त्व आणि व्रताचे लाभ

Marathi News Live : नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयाबाहेर ठिय्या आंदोलन, मंत्री अशोक उईके यांच्या राजीनाम्याची मागणी

Nanded Sarafa Traders Security: नांदेडमध्ये सराफा व्यापाऱ्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर आमदार बोंढारकर आक्रमक; पोलिस अधीक्षकांसमोर त्रास, वसुलीच्या तक्रारी मांडल्या

Swami Ramanand Teerth Marathwada University Promotions: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात ११ अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदोन्नती

SCROLL FOR NEXT