lalit patil drug case sassoon hospital employee and two others arrested pune crime Sakal
पुणे

Lalit Patil Drug Case : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात येरवडा कारागृहातील कॉन्स्टेबलला अटक; ससूनचा कर्मचारीही ताब्यात

ललित पाटील प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे केली

सकाळ वृत्तसेवा

पुणे : अमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार ललित पाटील प्रकरणी ससून रुग्णालयातील कर्मचारी महेंद्र शेवते आणि कारागृहातील पोलिस कर्मचारी मोईज शेख या दोघांना गुन्हे शाखेने मंगळवारी अटक केली.

ललित पाटील प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे केली होती. ललित पाटील ससून रुग्णालयातून कोट्यवधी रुपयाच्या अमली पदार्थ मेफेड्रोन विक्रीचे व्यवहार करीत होता.

ललित पाटील प्रकरणी चौकशी समितीच्या अहवालात दोषी आढळलेले ससूनचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना केवळ पदमुक्त केले आहे. ससूनमधील कर्मचारी महेंद्र शेवते हा रुग्णालयातील काही वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना पैशांची देवाण-घेवाण करण्यात मध्यस्थ म्हणून काम करीत असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला होता.

येरवडा कारागृहातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात यावी. तसेच शेवते याला अटक करण्याची मागणी त्यांनी केली होती. दरम्यान, या प्रकरणी चौकशीनंतर गुन्हे शाखेने शेवते आणि शेख या दोघांना अटक केली.

न्यायालयाने या दोघांना एक डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पोलिसांनी अमली पदार्थ विक्री प्रकरणात ललितसह त्याच्या साथीदारांविरुद्ध यापूर्वीच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोका) कारवाई केली आहे. ललितसह त्याचे साथीदार सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT