lalit patil Esakal
पुणे

Lalit Patil : अमली पदार्थ तस्कर ललितकडून आणखी तीन कोटींचे सोने जप्त

अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याने नाशिकमधील एका सराफा व्यापाऱ्याकडे ठेवलेले सुमारे तीन कोटी रुपये किमतीचे पाच किलो सोने पोलिसांनी जप्त केले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याने नाशिकमधील एका सराफा व्यापाऱ्याकडे ठेवलेले सुमारे तीन कोटी रुपये किमतीचे पाच किलो सोने पोलिसांनी जप्त केले. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिकमध्ये ही कारवाई केली.

अमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यातील मास्टरमाइंड ललित पाटील सध्या पुणे पोलिसांच्या कोठडीत आहे. त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. ललितने नाशिकमधील एका सराफा व्यापाऱ्याकडे सोने ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांच्यासह एक पथक गुरुवारी (ता. २) नाशिकला रवाना झाले होते. गुन्हे शाखेच्या पथकाने त्या सराफाकडून पाच किलो सोने जप्त केले आहे.

यापूर्वी पोलिसांनी ललितचा भाऊ भूषण पाटीलच्या घरातून एक कोटी ८० लाख रुपये किमतीचे तीन किलो सोने जप्त केले होते. गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे आणि पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

ललितने अमली पदार्थ मेफेड्रॉनच्या तस्करीतून मोठ्या प्रमाणावर मालमत्ता आणि सोने खरेदी केल्याचे तपासात समोर आले आहे. ललितकडून चौकशीत आणखी बरीच माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अकरावी प्रवेशाची उद्या पहिली गुणवत्ता यादी! विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर येणार मेसेज; १२.५१ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी, प्रत्येक फेरीपूर्वी नावनोंदणीची संधी

Vaibhav Sooryavanshi ओपनर, सोबतीला कोण? IPL 2026 मधील अनकॅप्ड खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन, तगड्या संघाला देईल टक्कर...

Latest Marathi News Live Update : पानशेत धरण कालव्यात बुडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू; हवेली आपत्ती व्यवस्थापन टीमची तत्काळ मदत

Fishing Ban: मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रात मासेमारी बंद राहणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Loni Kalbhor Crime : बारावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अल्पवयीन मुलाकडून वारंवार अत्याचार; मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT