lalit patil Esakal
पुणे

Lalit Patil : श्रीलंकेत पळून जाण्याच्या तयारीत होता ललित पाटील

अमली पदार्थ तस्कर ललित पाटील ससून रुग्णालयातून पसार झाल्यानंतर तो श्रीलंकेत पळून जाण्याच्या तयारीत होता, अशी माहिती आली समोर.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - अमली पदार्थ तस्कर ललित पाटील ससून रुग्णालयातून पसार झाल्यानंतर तो श्रीलंकेत पळून जाण्याच्या तयारीत होता, अशी माहिती समोर आली आहे. ललित सध्या पुणे पोलिसांच्या ताब्यात असून, त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. तर, ललितचा भाऊ भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे या दोघांना चौकशीसाठी मुंबई पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे.

मेफेड्रॉन तस्कर प्रकरणातील मास्टरमाईंड ललित अनिल पाटील, शिवाजी शिंदे आणि राहुल शंकर चौधरी (सर्व रा. नाशिक) या तिघांना मुंबई येथील न्यायालयीन कोठडीतून पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर न्यायालयाने बुधवारी (ता. १) ललितसह तिघांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. चौकशीत धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे. परंतु पोलिसांनी याबाबत माहिती देण्यास नकार दिला.

दरम्यान, ललित ससूनमधून पळाल्यानंतर रावेत, तेथून मुंबईला गेल्यानंतर नाशिकला गेला. त्याने नाशिकमधून मैत्रिणींकडून २५ लाख रुपये घेतले. त्यानंतर तो श्रीलंकेला जाण्याच्या तयारीत होता. त्यासाठी तो चेन्नईत गेला होता. चेन्नइमार्गे श्रीलंकेला जाण्याच्या तयारीत असताना मुंबई पोलिसांनी त्याला पकडले होते.

या गुन्ह्यात मुख्य आरोपी ललित पाटील याच्यासह आतापर्यंत १४ आरोपी निष्पन्न झाले आहेत. त्यापैकी ११ आरोपींना अटक झाली आहे. ललित, भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांनी इतर आरोपींच्या मदतीने नाशिकमध्ये अमली पदार्थाचा कारखाना सुरू केला. पुणे पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून आत्तापर्यंत २ कोटी १४ लाखांचे मेफेड्रोन, एक कोटी ८० लाखांचे तीन किलो सोने, दोन मोटारी असा मुद्देमाल जप्त केला आहे.

आता मुंबई पोलिस करणार भूषण, अभिषेकची चौकशी

भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे या दोघांना पुणे पोलिसांनी नेपाळ सीमेवरून अटक केली होती. हे दोघे न्यायालयीन कोठडीत आहेत. मुंबई येथील साकी नाका पोलिसांनी या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून दोघांना बुधवारी रात्री मुंबईला नेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- सुनेत्रा पवार

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

SCROLL FOR NEXT