Sakal Exclusive 
पुणे

पोटहिश्‍श्‍याचे वाद मिटणार

उमेश शेळेके

पुणे - ग्रामीणसह शहरी भागात जमिनीच्या पोटहिश्‍श्‍यावरून वर्षानुवर्षे वाद होतात. मात्र आता ही प्रक्रिया सुटसुटीत केली आहे. जमिनीचे पोटहिस्से करण्यासाठी आता सर्व सदस्यांच्या सहमतीची, अथवा न्यायालयाच्या आदेशाची गरज नाही. एखाद्या सदस्याची हरकत असेल, अथवा मोजणीच्या वेळेस तो गैरहजर राहात असेल, तर त्याला नोटीस काढावी. सुनावणीनंतर ती निकाली काढून जमिनीचे पोटहिस्से करावेत, असा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे. यामुळे अभिलेखातील दुरुस्तीसही मदत होणार आहे.

वडिलांच्या निधनानंतर कुटुंबातील सदस्यांमध्ये जमीन वाटपासाठी, अर्थात पोटहिश्‍श्‍यासाठी अर्ज केला जातो. त्यासाठी सर्व सदस्यांची सहमती गरजेची असते. त्यानंतर शुल्क आकारून भूमी अभिलेख विभागाकडून जमिनीचे पोट हिस्से करून त्यांची नोंद अभिलेखामध्ये घेतली जाते. परंतु अनेकदा कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद असतात. त्यामुळे एखाद्याने जरी सहमती दिली नाही, अथवा मोजणीच्या वेळेस गैरहजर राहिले, तर पोटहिश्‍श्‍याचे काम केले जात नाही.

त्यामुळे पर्याय म्हणून अन्य सदस्यांना दिवाणी न्यायालयाकडून त्या संदर्भातील आदेश प्राप्त करून घ्यावे लागतात. राज्यात अशा प्रकरणांची अन्‌ दाव्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेतला आहे.

कुटुंबातील सदस्यांमध्ये अनेकदा सहमती नसल्यामुळे पोटहिस्सा करण्याचे काम रखडते. दिवाणी न्यायालयातून त्यासाठीचे आदेश प्राप्त करावे लागतात. त्यात नागरिकांचा जाणारा वेळ आणि नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
- एस. चोक्कलिंगम, आयुक्त, जमाबंदी

...अशी होणार प्रक्रिया
    बहुसंख्य सदस्यांची सहमती असल्यास जमिनीची मोजणी करून पोटहिश्‍श्‍यासाठी अर्ज करावा.
    मोजणीच्या वेळेस एखाद्या सदस्य गैरहजर असेल, त्याची हरकत असेल तर त्याला क्षेत्रसमज नोटीस बजाविणार.
    संबंधिताचे म्हणणे ऐकून घेणार. त्यानंतर उपअधीक्षक नियमानुसार पोट हिश्‍श्‍याबाबतचे आदेश देणार.

जमिनीचा पोटहिस्सा म्हणजे काय?
एका कुटुंबामध्ये चार भाऊ असल्यास आणि त्यांना वडिलोपार्जित एक एकर जमीन (४० गुंठे) असेल तर तिचे चार हिस्से करावे लागतात. त्यानुसार प्रत्येकाच्या वाट्याला १० गुंठे जमीन येते. त्यानुसार भूमी अभिलेख विभाग जमिनीची मोजणी करून हिस्से करून देते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, Lord's ODI: इंग्लंडला RO-KO नडले, पण अखेर भारतीय संघाचा प्रयत्न तोकडे पडले! यजमानांनी विजयासह मालिकाही जिंकली

IND vs ENG: रोहित शर्माच्या शतकात LORD शार्दुल ठाकूरचं मोठं योगदान, पण कसं? जाणून घ्या नेमकं गुपित

ENG vs IND: Rohit Sharma चा लॉर्ड्सवर 'हिटमॅन' अवतार; शतक ठोकत इतिहास घडवला, गिलसोबतही केली विक्रमी भागीदारी

Parliament March Row: परवानगी मागितली नाही, दिलीही नाही; कलम १६३ लागू, संसद मार्चला दिल्ली पोलिसांचा स्पष्ट नकार

FIFA World Cup Final चा फिव्हर भारतातही! तीन राज्यातील शाळांना थेट सरकारी सुट्टी जाहीर

SCROLL FOR NEXT