पुणे

लोणी काळभोरमध्ये जमीन विक्रीत फसवणूक

CD

लोणी काळभोर, ता. २२ : भाडेपट्ट्यावर ताब्यात असलेली जमीन परस्पर विकून फसवणूक केल्याप्रकरणी लोणी काळभोरचे माजी सरपंच आणि बाजार समितीच्या माजी संचालकांसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रॅक्टरने ऊस पीक नांगरून नुकसान केल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे.
याप्रकरणी अलका श्रीहरी जागडे (रा. कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार माजी सरपंच योगेश प्रल्हाद काळभोर, कार्तिक योगेश काळभोर, माजी संचालक शिवदास प्रल्हाद काळभोर, आग्नेय शिवदास काळभोर, आदित्य उमेश काळभोर, त्र्यंबक राऊजी शेळके व ताराबाई आबू जागडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर येथील गट क्र. ११६ मधील ८१ गुंठे जमीन त्र्यंबक शेळके व ताराबाई जागडे यांच्या मालकीची होती. ही जमीन श्रीहरी जागडे यांनी २००३ मध्ये १११ वर्षांच्या भाडेपट्ट्यावर घेतली होती. गेल्या २३ वर्षांपासून जागडे कुटुंब येथे शेती करत आहे. मात्र, २१ मे रोजी या जमिनीवर आरोपींनी मालकी हक्काचा फलक लावला. त्यानंतर २२ मे रोजी शेतातील उभे ऊस पीक ट्रॅक्टरने नांगरून नष्ट करण्यात आले. मूळ मालकांना भाडेपट्ट्याची माहिती असतानाही आर्थिक फायद्यासाठी जमीन तिसऱ्या पक्षाला विकून विश्वासघात केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. लोणी काळभोर पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Orange Alert : विदर्भाला ‘ऑरेंज अलर्ट’; राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता पुणे घाटमाथ्याला ‘यलो अलर्ट’

IND vs NZ T20I Squad: भारत-न्यूझीलंड ट्वेंटी-२० मालिकेसाठी संघ जाहीर; अष्टपैलू खेळाडूची माघार, १५ जणांची तगडी टीम

PITRU PAKSHA 2026 VASTU TIPS: घरात सुख-शांती आणि सकारात्मकता राहिल टिकून! पितृपक्षापूर्वी फक्त 'या' ४ वस्तू बाहेर काढा

Marathi News Live Updates : माथेरान टॉय ट्रेनच्या मार्गावर दरड कोसळली

Ajit Pawar Jay Pawar : अजित पवारांचा 'अजित सृष्टी' देखावा पाहून जय पवारांना रडू आवरलं नाही; ‘आई अजून रडत असते का'?

SCROLL FOR NEXT