पुणे, ता. ८ : जमीन मोजणीचे अर्ज निकाली काढण्यासाठी भूमि अभिलेख विभागाने राबविलेल्या विशेष मोहिमेला यश आले आहे. जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत राज्यात ८५ हजार ३४१ मोजणी प्रकरणे निकाली काढण्यात आली. गतवर्षी याच काळात ५७ हजार १०० प्रकरणांचा निपटारा झाला होता, त्या तुलनेत यंदा २८ हजारांहून अधिक प्रकरणे निकाली निघाली आहेत.
हद्द कायम करणे, वाटणी, पोटहिस्सा आणि अतिक्रमणासंबंधीच्या वादात जमीन मोजणी महत्त्वाची ठरते. अनेकदा प्रकरणांमधील गुंतागुंत आणि प्रलंबित अर्जांमुळे नागरिकांना मोजणीसाठी प्रतीक्षा करावी लागते. प्रलंबित आणि नवीन अर्जांचा जलद निपटारा करण्यासाठी विभागाने ही विशेष मोहीम हाती घेतली होती. यामध्ये नियमित प्रकरणांसह दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रकरणांवर विशेष भर देण्यात आला. या मोहिमेमुळे मोजणी प्रक्रियेच्या कामगिरीत मोठी वाढ झाल्याचे भूमि अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
पुणे, कोकण, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूरसह राज्यातील महसुली विभागांमध्ये ही मोहीम प्रभावी ठरली. मोजणी अर्जांची प्रक्रिया ऑनलाइन झाल्यामुळे नागरिकांना अर्जाची सद्यःस्थिती आणि मोजणीची तारीख ऑनलाइन उपलब्ध होत आहे. यामुळे माहिती घेण्यासाठी वारंवार कार्यालयात जाण्याची गरज उरलेली नाही. अर्जापासून ते कार्यवाहीपर्यंतची सर्व माहिती पारदर्शकपणे मिळत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.