landslide in malshej ghat damage to truck and tempo police otur sakal
पुणे

Malshej Ghat Landslide : माळशेज घाटात दरड कोसळली! महामार्गावर लागल्या वाहनांच्या रांगा

धुक्या मध्ये लाईट लावून शक्यतो समुहाने एका मागे एक गाड्या पास कराव्या असे आवाहन प्रशासनाकडून

पराग जगताप

ओतूर : पुणे, ठाणे व नगर जिल्हाच्या सरहद्दीवर सह्याद्रीच्या पर्वत रांगेत पुणे आणि ठाणे जिल्ह्यांना जोडणाऱ्या नगर कल्याण महामार्गावरील माळशेज घाटात मंगळवारी सकाळी दरड कोसळल्याने मोठ्या प्रमाणात महामार्गावर राडारोडा आला आहे.

यावेळी येथून जात असलेल्या टेम्पोचे थोडे नुकसान झाले. टेम्पो चालक टेम्पो रस्त्यावर सोडून घाबरून पळून गेल्याची माहिती वाहन चालकांकडून मिळाली. त्यामुळे येथे एकेरी वाहतुक सुरू झाली आहे.

माळशेज घाट परीसरात गेल्या पाच सहा दिवसा पासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे छोट्या मोठ्या दरडी कोसळत आहेत. दरवर्षी प्रमाणे प्रशासन ही माळशेज घाटातील वाहतुक सुरळीत ठेवण्यासाठी सज्ज आहे.

वाहन चालकांनी माळशेज घाटात प्रवास करताना कोठे ही विनाकारण वाहन उभे करू नये. तसेच धुक्या मध्ये लाईट लावून शक्यतो समुहाने एका मागे एक गाड्या पास कराव्या असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM: भारतीय संघाचा वर्ल्ड रेकॉर्ड! T20I क्रिकेटमध्ये आजपर्यंत कोणीच न केलेला पराक्रम करून दाखवला

Govinda Insurance: गोविंदांसाठी आनंदाची बातमी! २ लाख गोविंदांना मिळणार विमा संरक्षण; दहीहंडीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Nanded News: नांदेड जिल्हा बँक निवडणुकीचा आज देगलूरात फैसला; सहकारातील राजकीय चुरस शिगेला

नव्या मुख्य सचिवांच्या नियुक्तीनंतर प्रशासनात मोठा बदल; २० IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, जाणून घ्या यादी...

Farmer Loan Waiver List : सिंधुदुर्गातील 307 गावांतील शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 'कर्जमुक्ती'ची पहिली यादी जाहीर; 6,711 शेतकरी पात्र, 53 कोटींहून अधिक निधी अपेक्षित

SCROLL FOR NEXT