Leopard Attack sakal
पुणे

Leopard Attack : मोटरसायकलवरून जात असलेल्या कुटुंबावर बिबट्याचा हल्ला; हातातील बॅग बिबट्याच्या तोंडावर मारल्याने मोठा प्रसंग टळला

पेठ येथून चुलत भावाच्या वडिलांच्या वर्षश्राद्धसाठी राऊत हे त्याच्या पत्नी व मुलासह रात्री दुचाकीवरून चांडोली खुर्द गावाकडे जात होते.

डी. के. वळसे पाटील

मंचर - चांडोली खुर्द (ता. आंबेगाव) येथे बुधवारी (ता. १५) दुचाकीवरून जात असताना भरत गोविंद राऊत (वय-५३ रा. पेठ, ता. आंबेगाव) व त्याची पत्नी रचना राऊत (वय-४३) व मुलगा समर्थ राऊत (वय-११) यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. त्यामध्ये भरत राऊत हे जखमी झाले. बिबट्या पुन्हा पाठलाग करत होता. पण प्रसंगावधान राखून व धाडस दाखवूनरचना राऊत यांनी हातातील बॅग बिबट्याच्या तोंडावर मारल्याने हे कुटुंब बिबट्याच्या तावडीतून वाचले आहे.

पेठ येथून चुलत भावाच्या वडिलांच्या वर्षश्राद्धसाठी राऊत हे त्याच्या पत्नी व मुलासह रात्री दुचाकीवरून चांडोली खुर्द गावाकडे जात होते. चांडोली फाटा येथे रस्त्याच्या शेजारील उसाच्या शेतातून अचानक आलेल्याबिबट्याने हल्ला केला. भरत राऊत यांच्या पायावर पंजा मारल्याने ते जखमी झाले आहेत.

त्यांनी प्रसंगावधान दाखवत दुचाकी जोरात पळवली. तेव्हा काही वेळ बिबट्याने त्यांचा पाठलाग केला. त्यांची पत्नी दुचाकीच्या मागे बसली असता तिने प्रसंगावधान दाखवत हातातील बॅग बिबट्याच्या तोंडावर फेकून मारली. त्यामुळे बिबट्या दबकला मात्र तो त्यांचा हळूहळू पाठलाग करत होता. त्याचवेळी रस्त्यावरून मागून येणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीची लाईट चमकल्याने बिबट्या पळून गेला.

भरत राऊत यांनी त्यांचा भाऊ राहुल राऊत याला फोन करून घटनेची माहिती दिली त्यांनी घटनास्थळी येवून भरत राऊत यांना मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. रुग्णालय प्रशासनाने याबाबत वनविभागाचे अधिकारी यांना कळवळे आहे. दरम्यान भरत राऊत हे कुटुंबातील कमावती व्यक्ती असून वनविभागाने अधिकारी यांनी योग्य तो पाठपुरावा करून त्यांना मदत मिळवून द्यावी. अशी मागणी भरत राऊत यांच्या कुटुंबियांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Paithan Highway Accident: पैठण–छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अपघात; सूरज एरंडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू, रुग्णवाहिकेसाठी अर्धा तास प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT