Corona Fight sakal media
पुणे

Good News : पुण्यातील शेवटच्या कोरोना रूग्णाला 'नायडू' मधून डिस्चार्ज

सकाळ डिजिटल टीम

पुणे : राज्यात दोन वर्षापूर्वी कोरोनाचा पहिला रूग्णाची नोंद झालेल्या पुण्यातून कोरोना पूर्णपणे हद्दपार झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. दरम्यान, पुण्यातील महापालिका रूग्णालयात उपचार घेणाऱ्या शेवटच्या कोरोना रूग्णाला रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे पुणे शहरातील सरकारी रूग्णालयात एकही कोरोना रूग्ण भरती नाहीये, अशी माहिती पुणे महानगर पालिकेचे सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली आहे. सध्या पुण्यामध्ये कोरोनाचे 98 सक्रीय रूग्ण असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शहरात सध्या 8 स्वॅब सेंटर कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. (Last Corona Patient Discharged From Pune )

वावरे म्हणाले की, पुणे शहरातील नायडू रूग्णालयात (Naydu Hospital Pune) उपचार घेणाऱ्या शेवटच्या कोरोना रूग्ण बरा झाला असून, त्याला रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आता शहरातील एकाही सरकारी रूग्णालयात एकही कोरोना रूग्ण दाखल नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ते म्हणाले की, सध्या शहरात कोरोनाचे एकूण 98 सक्रीय रूग्णांनी नोंद असून, हे सर्व रूग्ण होम क्वारंटाईनमध्ये उपचार घेत आहेत. (Pune Corona Update)

काय होती पुण्यातील कोरोना स्थिती

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 18 एप्रिल 2020 लाटेत 56,650 रूग्णांची नोंद करण्यात आली होती. तर, 22 जानेवारी 2022 रोजी एका दिवसात सर्वाधिक 8,600 रूग्णांची नोंद करण्यात आली होती. तर, जानेवारी 2022 मध्ये एका महिन्यात सक्रीय रूग्णसंख्या 54,000 हजारांवर पोहचली होती. (Active Corona Cases In Pune)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT