पुणे

आता मला थेट पतीच्या पगारातून पोटगी मिळते

सनील गाडेकर

पुणे- पोटगीच्या रकमेवरच माझी व मुलाची गुजराण होते. माझा छोटासा व्यवसाय आहे, पण त्यातून पुरेसे उत्पन्न मिळत नसल्याने पोटगीसाठी अर्ज केला होता. 10 हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश झाल्यानंतर पतीने तब्बल 8 महिने एक रुपया देखील दिला नाही. त्यामुळे नाइलाजास्तव पोटगी वसुलीचा दावा केला. आता मला थेट पतीच्या पगारातून पोटगी मिळते. ज्या दिवशी त्याचा पगार होईल त्याच दिवशी माझ्या खात्यात देखील पैसे जमा होत असल्याची माहिती सुजाता यांनी दिली. 

सुजाता आणि अनुप (नावे बदललेली) यांचा 2018 साली घटस्फोट झाला आहे. त्यांना एक मुलगा आहे. सुजाता यांच्याप्रमाणे विभक्त झालेल्या अनेक महिलांची पोटगीबाबत अडवणूक होते. त्यामुळेच पत्नीची आर्थिक कोंडी करू पाहणा-या पतीविरोधात फौजदारी कारवाई करीत गेल्या वीस महिन्यांत पोटगी वसुलीचे 655 अर्ज निकाली काढण्यात आले आहे. पतीच्या पगारातून रक्कम किंवा प्रसंगी त्यांच्या घरातील वस्तू विकून व स्थावर संपत्तीचा लिलाव करूनही पत्नीला पोटगी देण्याचे आदेश त्यात न्यायालयाने दिले आहेत. 

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हक्‍काचे पैसे मिळावे यासाठी जानेवारी 2019 पासून ऑगस्ट अखेरीस 615 अर्ज येथील कौटुंबिक न्यायालयात दाखल झाले आहेत. याच काळात पोटगी वसुलीचे 657 दावे निकाली काढण्यात आले आहेत. घटस्फोटासाठी दाखल होणाऱ्या सुमारे 30 दाव्यांत असे अर्ज दाखल होत असतात. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वसुलीच्या अर्जात काय निकाल होऊ शकतो 
- पतीच्या पगारातून पोटगीची रक्कम कपात. 
- घरातील वस्तू विकून पोटगीची तरतूद. 
- पगार किंवा वस्तूंतून पूर्ण पैसे मिळाले नाहीतर स्थावर मालमत्ता जप्त. 
- पतीला अटक व तुरुंगवासाची शिक्षा. 
- शिक्षा झाली तरी पैसे द्यावेच लागतात 

पोटगीची रक्कम थकविली तर ती वसूल करण्यासाठी न्यायालयाला अमर्यादित अधिकार आहेत. पतीकडे असलेल्या संपत्ती किंवा उत्पन्नातून पैसे न्यायालय वसूल करू शकते. काही प्रकरणांत तर पतीने जेवढे महिने पोटगी थकविली त्याला तेवढे महिने तुरुंगवासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. 
- ऍड. झाकिर मणियार 

गेल्या वीस महिन्यांत दाखल दावे 
पोटगी अर्ज 508 471 
पोटगी वसुली 615 657 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 तोंडावर असताना जसप्रीत बुमराह बंगळुरूतील CoE मध्ये दाखल ! मुंबई इंडियन्सला धक्का बसणार?

माहेरी गेलेल्या पत्नीला एकटं गाठून पतीने केला जीवघेणा हल्ला, घरात रक्ताचा सडा; फरार पतीचा शोध सुरू

Cancer Care Support: डॉक्टरांच्या मते सुरुवातीच्या टप्प्यातील कर्करोग पुन्हा उद्भवू शकतो; अशा वेळी 'केअरगिव्हर' म्हणून तुमची जबाबदारी काय?

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये टेम्पो दुचाकीवर आदळून एकाचा मृत्यू

कूलिंग चेंबरमध्ये स्फोटानंतर इमारत कोसळली, ९ कामगारांचा मृत्यू; माजी आमदाराच्या मालकीच्या कोल्ड स्टोरेजमध्ये दुर्घटना

SCROLL FOR NEXT