MHD26B04963
महूद (ता. सांगोला) : येथील फिनिक्स शैक्षणिक संकुलात आयोजित जिल्हास्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी मान्यवर.
.........
महूदच्या जिल्हास्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेत लातूर संघ विजेता
......
महूद, ता. १८ : महूद येथील फिनिक्स शिक्षण संकुलामध्ये आयोजित करण्यात आलेल्या निमंत्रित व्हॉलिबॉल स्पर्धेत लातूर संघाने प्रथम क्रमांक मिळविला.
स्पर्धेचे उद्घाटन संस्थाध्यक्ष पांडुरंग येडगे, श्री. कचरे, सचिव सविता कचरे, वसंत हेगडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी फिनिक्स शैक्षणिक संकुलातील तिन्ही प्रशालेचे मुख्याध्यापक व अध्यापक उपस्थित होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील निवडक आणि नामांकित व्हॉलिबॉल संघ सहभागी झाले होते. प्रथम क्रमांकासाठी अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यामध्ये लातुर संघाने विजय मिळविला. द्वितीय क्रमांक माढा क्लब माढा या संघाने तर तृतीय क्रमांक शांती निकेतन गुरुकुल कोर्टी (ता. पंढरपूर)यांनी पटकाविला. स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धा पार पाडण्यासाठी प्रशालेचे क्रीडा शिक्षक श्री. साठे व सर्व शिक्षक यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती खबाले यांनी केले. या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील व्हॉलिबॉल शौकिनांसाठी मोठी पर्वणी उपलब्ध झाली होती. क्रीडा संस्कृती जोपासणे आणि ग्रामीण भागातील खेळाडूंना संधी उपलब्ध करून देणे, हाच या स्पर्धेचा मुख्य उद्देश असल्याचे स्पर्धा संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.