पुणे

लातूरसह मराठवाड्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा

CD

लातूरसह मराठवाड्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा

औशात महिलांचा आक्रोश मोर्चा

ॲग्रोवन वृत्तसेवा

लातूर : लातूर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. पावसाअभावी शेतातील उभी पिके करपून गेली असून, कष्टाने पेरलेले सोयाबीन हातात येण्याआधीच उद्ध्वस्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर लातूरसह मराठवाडा तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी औसा तहसील कार्यालयावर महिला शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता. १५) आक्रोश मोर्चा काढला.

जिल्हा परिषद सदस्या दीपाली भोसले यांच्या नेतृत्वाखाली औसामोड ते तहसील कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. हातात करपलेले सोयाबीन घेऊन मोठ्या संख्येने महिला मोर्चात सहभागी झाल्या. ‘तात्काळ दुष्काळ जाहीर करा’, ‘शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर एक लाख रुपये मदत द्या’, ‘नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपये द्या’, ‘पिकांचे तातडीने पंचनामे करा’ अशा घोषणांनी औसा शहराचा परिसर दणाणून गेला.

यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने खरीप पिकांची पेरणी केली होती. मात्र, अपेक्षित पाऊस न झाल्याने पिकांची वाढ खुंटली आणि अनेक भागांत सोयाबीनसह इतर पिके करपून गेली. पेरणी, बियाणे, खते, औषधफवारणी व मशागतीवर झालेला खर्चही वसूल होण्याची शक्यता नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

नैसर्गिक संकटामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर एक लाख रुपयांची तातडीची मदत द्यावी, तसेच नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही विशेष बाब म्हणून दोन लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली. सरकारने कागदोपत्री पाहणी न करता प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीचे पंचनामे करावेत, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

हातात करपलेले सोयाबीन, डोळ्यांत अश्रू आणि सरकारकडे मदतीची आर्त हाक, अशा भावनिक वातावरणात निघालेल्या या मोर्चातून शेतकरी कुटुंबांच्या गंभीर परिस्थितीकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले.

यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे राजेंद्र मोरे, प्रहार संघटनेचे दत्ता आनंदगावकर, पप्पू भोसले, बबन भोसले, गणेश पाटील, काका पवार हरेगाव, कृष्णा जावळे, सयाजी दारफळकर, नेताजी भोसले, दयानंद भोसले, सरपंच सुजाता बनसोडे, पद्मिनी कोकासाहेब पवार, पार्वती सूर्यवंशी, अनुसया चव्हाण, सोनाली चव्हाण, जनाबाई चव्हाण, शमाबी शेख, जन्नत बी शेख, शामामबी चव्हाण, मंजुश्री चव्हाण, ऐशाळी शेख, सुनीता संजय चव्हाण, संगिता बनसोडे, सविता कांबळे, योगिता कांबळे, कस्तुराबाई मंगरुळे, गवळण मंगरुळे, रूपाली कांबळे, अंजना मंगरुळे, सुरेखा मंगरुळे, अनुसया वाघमारे, सुकमारबाई कांबळे, सुरेखा जाधव, भानीबाई कांबळे, अन्नपूर्णा कांबळे, रेखा कोव्हाळे, सचिता भेडाले, गिरिजा कोव्हाळे, बोपदी कोहाळे, लक्ष्मी कोव्हाळे, निमा कोव्हाळे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

फोटोओळ :

लातूर : मोर्चानंतर तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देताना महिला शेतकरी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

Pakistan Cricket : पाकिस्तानात शाहिद आफ्रिदीच्या नावावरून पसरलीय अफवा; नेमकं काय घडलं?

कोकणात मध्यरात्री बाप्पाची ‘चोरी’ होते? दारात गणपती ठेवून फटाके फोडण्यामागचं कारण ऐकून व्हाल भावूक!

श्रीविद्या अन् सीमंतमच्या विधी! सामंथाला ओटीभरणीत चाळणीने अंघोळ का घातली? काय आहे परंपरा? Video

Markandeya Parvat Yatra Ban : मार्कंडेय गडावर ऋषीपंचमी यात्रेला यंदाही 'ब्रेक'; भाविकांना केवळ पहिल्या पायरीपर्यंतच प्रवेश, प्रशासनाचा निष्काळजीपणा?

SCROLL FOR NEXT