Launch Multipurpose Lab at Universities as per Suggestion of Higher and Technical Education Ministers 
पुणे

विद्यापीठांमध्ये मल्टीपर्पज लॅब सुरू करा : उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांची सूचना

सकाळवृत्तसेवा

पुणे : साथीचे आजार पसरत असताना त्याच्या चाचण्या घेण्यासाठी विद्यापीठांमध्ये मल्टिपर्पज लॅब सुरू कराव्यात अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कुलगुरूंना दिल्या. 

 बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना संशयीत रुग्णांच्या थुंकींच्या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी पुरेशा लॅब नाहीत. यामुळे नुकतेच शासनाने खासगी लॅबमध्ये चाचणी घेण्यास परवानगी दिली आहे. 'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर यासंदर्भात उदय सामंत यांनी व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारे  राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक घेतली. त्यात विद्यापीठात विज्ञान विभागाच्या अनेक लॅब असतात, त्याचा उपयोग आजारांच्या चाचणीसाठी करता येऊ शकते यावर चर्चा झाली. 

सामंत म्हणाले, " नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने विविध आजारांची चाचणी घेण्यासाठी लॅब सुरू केली आहे. इतर विद्यापीठांनी याच पद्धतीने लॅब उभाराव्यात, यासाठी प्रस्ताव पाठविल्यास केंद्र शासन, राज्य शासन आणि आरोग्य विभागाच्या आवश्यक त्या सर्व परवानग्या तातडीने देण्यात येतील."

"आरोग्य यंत्रणेला सहकार्य करण्यासाठी काही दिवसांपूर्वी सोलापूर विद्यापीठाने प्रयोग राबविला, त्यात एनएसएसच्या 27 विद्यार्थ्यांना आईवडिलांकडून परवानगी घेऊन त्यांना आरोग्य सेवेचे प्रशिक्षण देऊन सज्ज केले. याच धर्तीवर राज्यातील इतर विद्यापीठांमध्ये सुद्धा एनएसएसचे विद्यार्थी आरोग्य यंत्रणेच्या सेवेसाठी अहवाल सादर करावा आशी सूचनाही सामंत यांनी दिली."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cooperative Strike : महाराष्ट्रात गटसचिवांचे असहकार आंदोलन, संगणकीय कामकाजावर बहिष्कार

T20 World Cup IND vs NAM :६,६,६,६,४! इशान किशनचे २० चेंडूंत अर्धशतक, संजू सॅसमननेही ३०० च्या स्ट्राईक रेटने चोपल्या धावा...

Latest Marathi News Live Update : गुळानी घाटात विद्यार्थ्यांची बस आणि डंपरचा अपघात

Ambegaon News : शिरदाळे येथील गावच्या तळ्यात मासे पकडताना साहेबराव केदारी यांचा पाण्यात बुडून मृत्यू

Horoscope : उद्याचा दिवस 'या' ४ राशीच्या लोकांसाठी लकी; अचानक मिळतील पैसे, प्रेम आणि नातेसंबंधात मोठा बदल, नोकरी-व्यवसायात यश

SCROLL FOR NEXT