laur of job fraud with 45 youth and girls crime against accused indapur police baramati
laur of job fraud with 45 youth and girls crime against accused indapur police baramati esakal
पुणे

Crime News : नोकरीचे आमिष दाखवून 45 युवक आणि युवतींची फसवणूक

संतोष आटोळे

इंदापूर : येथील प्रशासकीय भवन येथे बुथ लेवल ऑफिसर (बी.एल.ओ) म्हणून नोकरीस लावण्याचे आमिष दाखवून इंदापूर शहर व तालुक्यासह माळशिरस, माढा आणि पंढरपूर तालुक्यातील तब्बल 45 युवक आणि युवतींची फसवणूक केल्याचा प्रकार घडला असून याबाबत बारामतीच्या काटेवाडी येथील बाप, लेकावर इंदापूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात फैय्याज अकबर सय्यद (रा. दर्गाह मस्जिद नजीक, सावतामाळी नगर, इंदापूर) या युवकाने दिलेल्या फिर्यादीनुसार आदित्य संदीप पाटोळे आणि संदीप उर्फ राहुल भीमराव पाटोळे (दोघेही रा. काटेवाडी, ता बारामती) या बाप लेकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुरुप आरोपी आदित्य पाटोळे याने आपण बारामती येथील प्रशासकीय भवन येथे बूथ लेवल ऑफिसर (बी.एल.ओ) म्हणून कामास असल्याचे सांगत कलेक्टर ऑफिसमधून आपण इंदापूर प्रशासकीय भवन येथे बी.एल.ओ. भरतीचे कॉन्ट्रॅक्ट घेतल्याचे सांगितले. त्या अनुषंगाने त्या ठिकाणी बुथ लेवल ऑफिसर (बी.एल.ओ) म्हणून कामास लाऊन मॅनेजर बनवतो असे आमिष दाखविले.

तसेच मित्रांनाही बी.एल.ओ. म्हणून नियुक्ती देतो असे सांगितल्याने फिर्यादीने विविध ठिकाणच्या अनेक युवक आणि युवतींकडून प्रत्येकी 4 हजार 100 व काही जणांकडून 6 हजार 600 रूपये असे एकूण 2 लाख 12 हजार 700 रूपये 22 डिसेंबर 2022 ते 31 जानेवारी 2023 यादरम्यान गुगलपे आणि फोनपे-वरून आरोपी आदित्य पाटोळे याला दिले असल्याचे नमूद केले आहे.

तसेच आरोपींनी फिर्यादीच्या माध्यमातून फसवणूक केलेल्या युवक आणि युवतींमध्ये इंदापूर शहरासह इंदापूर तालुक्यातील पळसदेव, वडापुरी, काटी, कालठण नं 2, माळवाडी, निमगाव केतकी, बाभुळगाव, सरडेवाडी आणि वालचंदनगर,

सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील आलेगाव, रांझणी, माळशिरस तालुक्यातील अकलूज, म्हाळुंगे, माळवली आणि पंढरपूर तालुक्यातील करकंभ अशा एकूण 45 युवक आणि युवतींचा समावेश असून त्यांची नाव व पत्तेही फिर्यादी मध्ये नमूद केलेआहेत.

या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे करत आहेत. नायब तहसीलदारांची मयत झाल्याचे कारण देत जॉईनिंग टाळले. आरोपी आदित्य पाटोळे याने सर्वांना जॉईनिंग करून घेणार असल्याचे सांगत सर्व उमेदवारांना घेऊन 29 डिसेंबर रोजी इंदापूर प्रशासकीय भवन येथे येण्याचे फिर्यादीला सांगितले होते. मात्र बारामतीच्या नायब तहसीलदारांची मयत झाल्याचा बहाणा करत आरोपीने सर्वांना जॉईनिंग नंतर देण्यात येईल असे सांगितले. अशाच पद्धतीने आरोपीने वारंवार फिर्यादीची फसवणूक केल्याचे नमूद केले आहे.

ॲट्रॉसिटी करून जेलमध्ये सडवेन; आरोपींची धमकी

इंदापूर येथे आलेल्या आरोपी संदीप उर्फ राहुल पाटोळे यांनी पैसे मागणे सोडून द्या अन्यथा ॲट्रॉसिटीची केस करेन, जेलमध्ये सडवेन, गाठ माझ्याशी असल्याची धमकी चर्चेसाठी गेलेल्या फिर्यादी, त्याची आई, वडील आणि मित्राला दिली. तसेच असाच प्रकार 13 फेब्रुवारी 2023 रोजी आरोपींच्या काटेवाडी येथील घरी देखील घडल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT