Lavasa Landslide sakal
पुणे

Lavasa Landslide : लवासातील बेपत्ता कामगारांचा अद्याप शोध सुरूच; रस्ते बंद झाल्याने मदत कार्यात अडथळे

लवासा (ता. मुळशी) येथील कोसळलेल्या व्हिलामध्ये अडकून पडलेल्या दोन कामागारांचा अद्याप शोध लागलेला नाही.

सकाळ वृत्तसेवा

पिरंगुट - लवासा (ता. मुळशी) येथील कोसळलेल्या व्हिलामध्ये अडकून पडलेल्या दोन कामागारांचा अद्याप शोध लागलेला नाही. कालपासून येथील व्हिला भोवतालची माती व राडारोडा काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असूनही विविध कारणांनी मदत कार्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे तेथील दोन कामगार अद्यापही बेपत्ता आहेत.

राहुल घोरेचा (वय ४२) व मनोज चुडासामा (वय अंदाजे ६३) अशी बेपत्ता कामगारांची नावे असून दोघेही मुंबई येथील दहिसरमधील रहिवासी आहेत. परवा गुरुवार दिनांक २५ रोजी हे दोघे कामगार इलेक्ट्रीशियनची कामे करण्यासाठी लवासात आले होते. लवासातील एका व्हिलामध्ये इलेक्ट्रीकची कामे सुरू होती.

काल दरडीसहित व्हिला कोसळून खाली आल्याने तेव्हापासून हे दोन्हीही कामगार बेपत्ता झालेले आहेत. कोसळलेल्या व्हिलाखाली, मातीमध्ये ते दोघे अडकून पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

कालपासून येथील दरडीची माती व राडारोडा दूर करून या दोघांचा शोध घेण्याचे काम चालू आहे. त्यासाठी सध्या तेथे जेसीबी व अन्य साधने आहेत. मात्र मातीचे प्रामण खूपच असल्याने ही माती तसेच अन्य राडारोडा बाजूला करायला मदतनिसांची दमछाक होत आहे. त्यामुळे कालपासून सुरू केलेले मदत कार्य अद्यापही पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यात तेथील भागात अद्यापही पावसाची जोरदार हजेरी चालूच आहे. त्यामुळे माती दूर करण्यासाठी गेलेल्या व्यक्ती तेथील मातीत अडकून पडत आहेत.

लवासात जाण्यासाठी दोनच मुख्य व रस्ते सुलभ आहेत. त्यापैंकी एक रस्ता पानशेत मार्गे वरसगाव-आडमाळ व लवासा असा आहे. तर दुसरा रस्ता पिरंगुट-मुठा-टेमघर असा आहे. सध्या टेमघर येथील रस्ता खचल्याने बंद ठेवला आहे. तर पानशेतमार्गे असलेला रस्ताही पडळघर या ठिकाणी कालच्या पावसात पूर्ण वाहून गेला आहे.

बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी माती व राडारोडा बाजूला करायला जेसीबी अपुरी पडत आहे. त्या ठिकाणी पोकलेनची अत्यंत गरज आहे. मात्र सध्या दोन्हीही रस्ते बंद असल्याने तेथे पोकलेन जाऊच शकत नाही. त्यामुळे मदत कार्यात मोठा अडथळा झाला आहे. अस्मानी संकटामुळे प्रशासनापुढे मोठेच संकट उभे राहिलेले आहे.

याबाबत उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले पाटील म्हणाले, सध्या लवासात पाऊस पडत असून शोध कार्यात अडथळा येत आहे. त्या ठिकाणी पोकलेनची गरज आहे. सध्या लवासात जाणारे दोन्हीही रस्ते बंद झाल्याने उद्या अन्य पर्यायी रस्त्याने पोकलेन उपलब्ध करून शोध कार्य पुन्हा सुरू करणार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

Crime: पक्षातील सदस्याला अडकवण्यासाठी घरात स्फोटके आणि दारू ठेवली, पण काँग्रेस नेता स्वत:च अडकला अन्...; काय घडलं?

दुर्दैवी घटना! 'सख्ख्या काकाच्या पिकअपखाली सापडून चिमुरड्याचा मृत्यू'; आंबेगाव तालुक्यातील घटना, कुटुंबीयांचा आक्रोश

INDW vs PAKW सामन्यात वाद! पाकिस्तानी फलंदाज विकेटनंतरही मैदान सोडेना, कर्णधाराचीही अंपायरसोबत चर्चा; भारताचं मात्र सेलिब्रेशन

INDW vs PAKW, Video: पाकिस्तानचा पोपट झाला! जेमिमाहला रोड्रिग्सच्या विकेटसाठी सेलीब्रेशन करत होते अन् अचानक...

SCROLL FOR NEXT