Police
Police 
पुणे

कायद्याच बोला; दंड भरल्यावर पुणे पोलिसांनी काढला 'अ‍ॅम्बुलन्स'चा जॅमर

निलेश बोरुडे

किरकटवाडी - मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून अडवून ठेवलेली खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका पुणे शहर वाहतूक पोलीसांच्या समर्थ पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सोडली मात्र दोन हजार रुपये दंड सोडला नाही. मनसेच्या खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पुणे शहर वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांना निवेदन देऊन याबाबत चौकशीची मागणी केली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

8 मार्च रोजी हवेली पंचायत समिती कार्यालयासमोर रस्त्याच्या कडेला थांबलेल्या खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेला समर्थ पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी जॅमर लावले होते. महत्त्वाचे म्हणजे तीन ते साडेतीन लाखांचे कोरोना लसिकरणाची औषधे यावेळी रुग्णवाहिकेत ठेवण्यात आले होते. पोलीसांनी जॅमर लावून ठेवल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांना रुग्णवाहिकेतून औषधे उतरवून घेऊन पर्यायी वाहनाची व्यवस्था करणे भाग पडले.

'सकाळ'मधून वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर रुग्णवाहिका सोडण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या खडकवासला विधानसभा मतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे शहर वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. लसीकरणा दरम्यान औषधांची ने-आण करण्यासाठी वापरण्यात येत असलेली रुग्णवाहिका वाहतूक पोलिसांनी अशा प्रकारे अडवून ठेवणे हे अत्यंत निंदनीय कृत्य असल्याचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांना सांगितले व संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. त्यानंतर मनसेच्या शिष्टमंडळाने समर्थ पोलीस ठाण्यात जाऊन दोन हजार रुपये दंड भरला आणि रुग्णवाहिका खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या चालकाने ताब्यात घेतली.

'हजारो वाहने बेवारसपणे रस्त्यावर उभी असतात त्यावर वाहतूक पोलीस कारवाई करताना दिसत नाहीत. रुग्णवाहिकेवर कारवाई करुन इतके दिवस रुग्णवाहिका अडवून ठेवणे हे अत्यंत निंदनीय कृत्य आहे. सदर रुग्णवाहिका ही सरकारी आहे हे सुद्धा पोलीस मान्य करत नव्हते. पोलीस निरिक्षकांची भाषाही खुप उद्धट होती. दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी मनसेकडून पोलीस उपायुक्तांकडे करण्यात आली आहे. 

'आरोग्य विभागाचीही जबाबदारी आहे. संबंधितांनी काय अडचण आहे हे पाहायला हवे होते. गाडी न्यायला कोणी आल्याशिवाय कोणाच्या ताब्यात द्यायची असे संबंधित पोलीस निरिक्षकांचे म्हणणे होते. याबाबत चौकशी करून पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे स्पष्टीकरण पुणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्तांनी दिले आहे.

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: 'दोन बायका असणाऱ्यांना 2 लाख रुपये देऊ'; निवडणुकीदरम्यान काँग्रेस नेत्याचं आश्वासन.. राजकारण तापलं

MSC Aries: भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आणखी एक विजय, 5 खलाशांची इराणकडून सुटका

SBI : स्टेट बँकेला २०,६९८ कोटींचा निव्वळ नफा; भागधारकांना प्रतिशेअर १३.७० रुपयांचा लाभांश जाहीर

Bajrang Punia : बजरंगच्या ऑलिंपिक प्रवेशाच्या आशांना सुरुंग ; जागतिक कुस्ती संघटनेकडूनही निलंबनाची कारवाई

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये आयकर विभागाचे छापे

SCROLL FOR NEXT