Shooting
Shooting sakal
पुणे

नारायणगाव परिसरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर

रवींद्र पाटे ः सकाळ वृत्तसेवा

नारायणगाव : येथील बसस्थानक चौकात हॉटेलमध्ये गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच त्या नंतर दोन खून झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या मुळे नारायणगाव परिसरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला असल्याची चर्चा सुरू आहे. वाढलेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणेने अधिक अलर्ट राहण्याची गरज आहे. मंगळवारी(ता.१०) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास येथील हॉटेल कपिल बियर बार मध्ये दोन गटात झालेल्या वादातून चाकू व पिस्तुल सारख्या प्राणघातक शस्त्राचा वापर करून दहशत निर्माण करण्यात आली.

या प्रकरणी पोलिसांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून फरार झालेल्या मुख्य आरोपीसह सात जणांना गुरुवारी (ता.१२) अटक केली.अटक आरोपी मध्ये चार अल्पवयीन मुले आहेत. इतर फरार आरोपींचा तपास सुरू असतानाच गुरुवारी(ता.१२) येथील पुणे नाशिक महामार्गा लगत नारायणगाव पोलीस स्टेशन पासून जवळच असलेल्या जयहिंद टायर वर्क्स या दुकानात काम करणाऱ्या मोहम्मद अब्बास या तरुणाचा त्याच्या सहकारी कामगाराने दुकानातील खोलीतच गळा आवळून खून केला. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. खून केल्या नंतर आरोपी बिहार या त्याच्या मूळ गावी फरार झाला आहे. गोळीबार व खून या दोन्ही घटनांचा तपास सुरू असतानाच आज सकाळी येथील मीना नदीच्या तिरावर असलेल्या हरिहरेश्वर मंदिराच्या जवळ संभाजी बबन गायकवाड (वय ४४ राहणार येणेरे तालुका जुन्नर) याचा मृतदेह आढळून आला.

गायकवाड यांच्या डोक्यावर गंभीर स्वरूपाची दुखापत झाली असून डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्त प्रवाह झाल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. या प्रकरणी नारायणगाव पोलीस तपास करत आहेत.१० मे २०२१ रोजी गोळीबाराची घटना झाल्या नंतर ११ मे व १२ मे २०२२ आशा सलग दोन दिवस खुन झाल्याचा घटना झाल्या. दोन महिन्या पूर्वी कावळ पिंपरी येथील तरुणाचा खून झाला होता. या घटनेतील आरोपींना गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली . येडगाव धरण जलाशयात सातत्याने कृषी पंपाच्या केबल चोरीच्या घटना घडत आहेत. मोटार सायकल व इतर वाहने चोरीच्या , घरफोडीच्या घटना अधूनमधून सुरूच आहेत.२४ नोव्हेंबर २०२२ रोजी पुणे नाशिक महामार्गालगत असलेल्या चौदा नंबर येथील अनंत ग्रामिण सहकारी पतसंस्थेत भर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दरोडा पडला होता.या घटनेत दोन अज्ञात सशस्त्र तरुणांनी पिस्तूलातुन गोळी झाडून पतसंस्थेचे व्यवस्थापक राजेंद्र दशरथ भोर ( वय ५२) यांचा खून करून पतसंस्थेची सुमारे अडीच लाख रुपयांची रक्कम लुटून नेली होती.घटनास्थळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली होती. सहा महिन्यां नंतर अद्याप या घटनेचा तपास लावून दरोडेखोरांचा शोध लावण्यात, आरोपींची नावे निष्पन्न करण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही.

नारायणगाव ही तालुक्यातील मोठी बाजारपेठ आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतमाल खरेदी विक्रीतुन रोज लाखो रुपयांची उलाढाल होत असते.टोमॅटो आवार परिसरात सुद्धा गुन्हेगारांचा वावर असल्याचे या पूर्वीच्या घटनांवरून निष्पन्न झाले आहे.एकूणच गुन्ह्याच्या घटना वाढत असल्याने सर्व सामान्य नागरिक, शेतकरी, महिला, व्यापारी वर्ग यांच्या मधून चिंता व्यक्त होत आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचा बिमोड करण्यासाठी पोलिस यंत्रणेने ॲक्शन मोड मध्ये येऊन अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. रात्रीची नाकाबंदी करणे आवश्यक आहे. या साठी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक यांनी जाणीवपूर्वक लक्ष घालण्याची व रात्रीचा अधिकचा पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला तिसरा धक्का, कर्णधार केएल राहुलपाठोपाठ दीपक हुड्डाही आऊट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT