Law Exam Admission is still processing even after first semester exam started 
पुणे

प्रथम सत्र परीक्षा आली तरी LAWची प्रवेश प्रक्रिया संपेना

सकाळवृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची प्रथम सत्र परीक्षा एप्रिल महिन्यात होणार असताना सीईटी सेलने नियुक्त केलेल्या महाआयटी कंपनीकडून येणाऱ्या एररमुळे विधीच्या (लॉ) पदवी अभ्यासक्रमाची प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया एक महिना लांबली आहे. वर्गच सुरू झाले नसल्याने विद्यार्थ्यांसमोर गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून लॉच्या तीन वर्ष आणि पाच वर्ष अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. तीन वर्षाच्या अभ्यासक्रमाची संस्थास्तरावरील प्रवेश प्रक्रिया २२ मार्चपासून सुरू झाली असून ती ९ एप्रिलपर्यंत चालणार आहे. तर पाच वर्षाच्या अभ्यासक्रमाची प्रक्रिया १९ मार्चपासून सुरू झाली आहे. ती १ एप्रिलपर्यंत चालणार आहे. पुणे विद्यापीठाने १० एप्रिलपासून प्रथम सत्र परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला असून, २७ मे पर्यंत परीक्षा सुरू राहण्याची शक्यता आहे. ज्या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया लांबली आहे त्यांची ७० टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा घेतली जाईल असे परीक्षा मंडळाने स्पष्ट केले असून, यामध्ये लॉचा समावेश आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

लॉची प्रवेश परीक्षा सीईटी सेलकडून केली जात आहे. ही ऑनलाइन प्रक्रिया महाआयटी कंपनीकडून केली जात आहे. यामध्ये कृषी व लॉच्या प्रवेशामध्ये मोठ्याप्रमाणात अडचणी निर्माण झाल्या होत्या. यासंदर्भात सीईटी सेलचे आयुक्त चिंतामणी जोशी यांनी बैठकाही घेतल्या होत्या.

सीईटी सेलकडून ही प्रक्रिया लांबणीवर पडत असताना अजूनही लॉ तीन वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी १७ हजार विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. विद्यार्थी प्रवेशासाठी वंचित राहू नये अशी मागणी उच्च व तंत्र शिक्षण मंत्र उदय सामंत यांच्याकडे केली असल्याचे महाराष्ट्र स्टुंडट वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष वैभव एडके यांनी केली आहे.

घरातील उत्सव सेलिब्रेट न करता, पुण्याच्या प्राध्यापकाचे COVID रिलिफ फंडला दिले 4.5 लाख 

''एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लॉची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल. महाआयटी कंपनीच्या सॉफ्टवेअरमध्ये एरर येत असल्याने ही प्रक्रिया एक महिना उशीर झाली आहे.''
- चिंतामणी जोशी, आयुक्त, सीईटी सेल


''संस्थास्तरावरील प्रवेश आत्ता सुरू झाले आहेत. विद्यापीठाने एप्रिल महिन्यात परीक्षा घेतली जाईल असे जाहीर केले आहे. आता आमचे कॉलेज कधी सुरू होणार, शिकवणार कधी आणि आम्ही परीक्षा कधी देणार हेच कळत नाही.''
- अमेय कुलकर्णी, विद्यार्थी

Pune Corona Update: पुण्यात कोरोना रुग्ण संख्येचा नवा उच्चांक; चिंता वाढली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! जमिनीच्या प्रत्येक पोटहिश्श्याची मोजणी आता 200 रुपयांत होणार; महसूल विभागाचा निर्णय, 7/12 उताऱ्यावरील सर्वांच्या संमतीची अट, वाचा...

Shikhar Shingnapur: शिखर शिंगणापूरच्या कळसाला मानाचा ध्वज; ‘हर हर महादेव’चा जयघोष, मध्यरात्री शिवपार्वती विवाह, काय आहे पारंपरिक प्रथा?

आजचे राशिभविष्य - 27 मार्च 2026

Quick and Healthy Breakfast: लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडेल! झटपट बनवा प्रोटीनने भरपूर 'मसूर कटलेट्स'; हेल्दी आणि चवदार नाश्ता

Today Panchang : आजच्या दिवशी ‘हे’ स्नान, मंत्रजप अन् दान देईल शुभ फल!

SCROLL FOR NEXT