Laxman Hake speaking at a press conference about allegations against Sambhaji Raje.  esakal
पुणे

Laxman Hake: संभाजी राजेंनी माझ्या अंगावर माणसे घातली, ६, ७ वाजता कोण दारु पितं? लक्ष्मण हाकेंनी स्पष्ट केली भूमिका

Laxman Hake's Allegations Against Sambhaji Raje: हाके यांचा आरोप आहे की, त्यांच्यावर आक्रमण करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. त्यांनी ही घटना सार्वजनिक केली आणि सांगितले की, "माझ्यावर हल्ला झाल्यानंतर मी त्वरित पोलिस ठाण्यात गेलो, पत्रकार परिषद घेतली."

Sandip Kapde

कोंढवा परिसरात सोमवारी रात्री ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर मद्यसेवन केल्याचा आरोप करून काही मराठा आंदोलकांनी त्यांना जाब विचारला. या वादामुळे तणाव निर्माण झाला. कोंढवा पोलिस ठाण्यात आंदोलकांनी हाके यांच्या वैद्यकीय चाचणीची मागणी केली. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हा वाद काहीसा शांत झाला. लक्ष्मण हाके यांनी या घटनेवर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. त्यांनी स्पष्ट केले की, हा प्रकार त्यांच्याविरुद्ध एक पूर्वनियोजित कट असल्याचे दिसत आहे.

"संभाजी राजेंनी माझ्यावर माणसे पाठवली"

लक्ष्मण हाके यांनी स्पष्ट केले की, ते वॉकींगला गेल्यावर मते नावाचा एक तरुण त्यांना भेटला. त्याने त्यांना अशांत करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर हा वाद वाढला. हाके यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकारात संभाजी राजेंचा हात आहे. ते पुढे म्हणाले की, मते आणि त्याचा साथीदार यांची कॉल तपासणी केली तर या कटाचा पुरावा मिळेल.

हाके यांनी ओबीसी समाजावर होणाऱ्या अन्यायाबद्दल आणि आंदोलनाबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांचा आरोप आहे की, संभाजी राजे यांनी त्यांच्यावर मारेकरी पाठवले. हाके म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्यासाठी ओबीसी समाज नेहमीच लढला आहे. ओबीसींच्या आरक्षणाच्या लढाईत आम्ही लढत आहोत, पण संभाजी राजे ओबीसी आंदोलनाला विरोध करत आहेत."

दारु सेवनाचा आरोप आणि हाके यांचा प्रत्युत्तर

हाके यांच्यावर मद्यसेवन केल्याचा आरोप केला गेला होता, परंतु त्यांनी हा आरोप ठामपणे नाकारला. त्यांनी सांगितले की, "दारु पिण्याचा वेळ ६-७ वाजता असतो का? मला पाच वाजता मते नावाच्या तरुणाने भेटले आणि त्यानंतर हा वाद सुरु झाला. मी रक्ताचे नमुने दिले आहेत आणि पोलिसांसमोर सर्व पुरावे सादर केले आहेत."

हाके यांचा आरोप आहे की, त्यांच्यावर आक्रमण करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. त्यांनी ही घटना सार्वजनिक केली आणि सांगितले की, "माझ्यावर हल्ला झाल्यानंतर मी त्वरित पोलिस ठाण्यात गेलो, पत्रकार परिषद घेतली."

ओबीसी आंदोलनाच्या लढाईत ठाम

लक्ष्मण हाके यांनी स्पष्ट केले की, ते ओबीसी आंदोलनाच्या लढाईत ठाम आहेत आणि कोणत्याही प्रकारे दबावाखाली येणार नाहीत. ते म्हणाले, "संविधानाची भाषा बोलणारा मी कार्यकर्ता आहे. माझ्यावर कितीही आरोप झाले तरी मी ही लढाई सोडणार नाही."

संविधानाच्या मार्गाने लढाई

हाके यांनी संविधानाच्या आधारावर ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी लढण्याची ठाम भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, "संविधान आणि लोकशाहीच्या मूल्यानुसार मी लढत राहीन. माझ्या जीवनाला धोका असला तरीही मी माझी भूमिका बदलणार नाही. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये माझे हात तरुणांनी पकडलेले होते. काहींनी मान पकडली होती. यापूर्वी देखील चारजण वडीगोद्रीत आंदोलन स्थळी आले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT