लक्ष्मणराव पाटील यांच्यामुळे सर्वसामान्यांना न्याय
बाळासाहेब सोळस्कर; वाठार स्टेशन येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन
वाठार स्टेशन, ता. २५ : लक्ष्मणराव पाटील यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक कार्यकर्ते घडवले. जिल्हा बॅंक, साखर कारखान्यासारख्या विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर पाटील यांनी केले.
येथील आशीर्वाद हॉस्पिटलचे डॉ. सुयोग लेंभे आणि समर्थ मेडिकलचे सुहास जाधव यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक रामभाऊ लेंभे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव महाडिक, माजी सदस्य सुरेशराव साळुंखे, सतीश धुमाळ, मंगेश धुमाळ, पंचायत समितीचे सदस्य नीलेश जगदाळे, रूपाली साळुंखे, विकास साळुंखे, सरपंच सीमा चव्हाण, अंकुशराव जाधव, नागेश जाधव, उपसरपंच इर्शाद मोमीन आदी उपस्थित होते. यावेळी १०५ रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदवला.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित दादांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेचे अध्यक्ष सोपानराव चव्हाण, उपाध्यक्ष श्रीकांत शेटे, व्यवस्थापक अशोक लेंभे, छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेचे संचालक सभासद व कर्मचारी, संभाजी धुमाळ, सचिन पोळ, दत्तात्रय भोईटे, संजय भोईटे, सचिन जाधव, सुहास जाधव, चंद्रकांत पवार, शब्बीर शेख, विकास मतकर, डॉ. देवयानी लेंभे, शामल जाधव व नागरिक उपस्थित होते. डॉ. सुयोग लेंभे यांनी प्रास्ताविक केले. नागेश जाधव यांनी आभार मानले.
00331
वाठार स्टेशन : रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बाळासाहेब सोळसकर, रामभाऊ लेंभे, रूपाली साळुंखे व पदाधिकारी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.