TMB26B03826
टेंभुर्णी (ता. माढा) : येथील लक्ष्मी आनंद विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजमध्ये विज्ञान व कला प्रदर्शनाचे उद्घाटन करताना जनता विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक ए. एम. सय्यद यावेळी उपस्थित अनुराधा बोबडे, डॉ. मदन कांबळे व इतर.
..........
लक्ष्मी आनंद विद्यामंदिरात कला अन् विज्ञान प्रदर्शन
........
टेंभुर्णी, ता. १ : टेंभुर्णीतील श्री माऊली शिक्षण प्रसारक व समाजसेवा मंडळ संचलित लक्ष्मी आनंद विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजमध्ये विज्ञान दिनाचे औचित्य साधून विज्ञान व कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन जनता विद्यालयातील विज्ञान विषयाचे सेवानिवृत्त शिक्षक ए. एम. सय्यद, अनुराधा बोबडे व डॉ. मदन कांबळे या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रदर्शन सोहळ्यामध्ये फैज जहागीरदार या विद्यार्थ्याने सुरेल गीतामध्ये व्हॅलेंसी सॉंग सादर केले. तसेच इयत्ता पाचवी ते सातवीमधील विद्यार्थिनींनी वैज्ञानिक दृष्टिकोनावरआधारित असलेला नृत्याविष्कार आणि थीम डान्स सादर केला. प्रदर्शनादरम्यान विद्यार्थ्यांनी पेपर आर्ट, स्टोन आर्ट, बॉटल आर्ट, क्राफ्ट, विज्ञान फलक अशा विविध कला प्रदर्शनाने उपस्थितांची मने जिंकली. तसेच विज्ञान प्रदर्शनामध्ये जवळपास १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. यामध्ये प्लास्टिक रोड, कार्बन अपसॉरबर, वॉटर हार्वेस्टिंग, वॉटर फिल्ट्रेशन,सोलार सिस्टिम, लावारसाचा उद्रेक, व्हाट्सअप व्हिजर्ड, पवनचक्क, डिजिटल माहिती ज्युनिअर कॉलेज क्रॉप सायन्स विभागाच्या वतीने डिजिटल माहिती फलक या व अशा अनेक प्रकल्पांचा समावेश होता.
विज्ञान प्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष योगेश बोबडे तसेच सचिवा सुरजा बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. यावेळी प्राचार्य विकास करळे, पीआरओ सागर खुळे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.