Lazy Corporators has been scolded by RSS Official 
पुणे

नगरसेवकांनो, बाहेर पडा; संघाच्या पदाधिकाऱ्याकडून कानउघाडणी 

सकाळवृत्तसेवा

पुणे, : "कोरोना बाधित रुग्ण सापडला, तेथे भेट द्या, क्‍यॉरंटाईन सेंटरला भेट देऊन तेथे असलेल्या नागरिकांच्या काय अडचणी आहेत, त्या जाणून घ्या.... प्रभागात एकही माणूस उपाशी राहिला नाही पाहिजे... त्यासाठी बाहेर पडा.. अशा तिखट शब्दात भाजपच्या कामचुकार नगरसेवकांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रांतातील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी कानउघाडणी केल्याचे समजते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 23 मार्च पासून लॉकडाऊन लागू करण्यात आल्या. लॉकडाऊनचा कालावधी तीन वेळा वाढविण्यात आल्या. त्यामुळे शहरातील अनेक भागातील नागरिकांचे हाल सुरू आहेत. तर नगरसेवक कुठे आहेत, असा प्रश्‍नही नागरिकांकडून विचारला जात आहे. त्यांची दखल खुद्द संघाच्या पदाधिकाऱ्यांना घ्यावी लागली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

लॉकडाऊनच्या काळात कोणी कोणी आणि काय काय मदत केली, यांचा माहिती दररोज पक्षाकडून घेतली जात आहे. त्यामध्ये शहराच्या काही भागात पक्षाचे नगरसेवक मनापासून काम करीत आहेत. तर काही नगरसेवक केवळ दिखाऊपणा करीत असल्याचे आढळून आले. काम मुंगी एवढे करून पक्षाला हत्ती एवढे केल्यासारखे भासवीत असल्याचे काही उदाहरणे समोर आली आहेत. महापालिकेत पक्षाचे शंभर नगरसेवक आहे. त्यापैकी तीस ते चाळीस टक्के नगरसेवक अशा प्रकारे कामचुकारपणा करीत असल्याचे त्यातून पुढे होते. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दोन दिवसांपूर्वी संघाच्या या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी वेबीनारच्या माध्यमातून कामाचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना करताना कामचुकार नगरसेवकांची कानघडणी केली. त्यामुळे पक्षात हा चर्चेचा विषय झाला आहे. पुणे शहरात पक्षात गटातटाचे राजकारण सुरू आहे. काही गटाचे नगरसेवक पक्षाच्या आदेशाला जुमानत नसल्याचे यापूर्वीही अनेकदा समोर आले आहे. या महामारीच्या काळात पक्षाने दिलेल्या सूचनांना त्यांनी केराची टोपली दाखवली असल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा पुढे आले. त्यामुळे पक्षाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांसमोरच संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने कानउघाडणी केल्यामुळे ते आता तरी काम करतील,अशी अपेक्षा पक्षाकडून व्यक्त केली जात आहे. 

पुणे : चाैथ्या लॉकडाउनची नियमावली जाहीर; पुण्यात काय राहणार बंद?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : अजितदादांच्या निधनानंतर 'सोमेश्वर' कारखाना निवडणूक बिनविरोध होणार?, शरद पवारांचा पुढाकार; 'सिल्व्हर ओक'वर दोन्ही गटांची बैठक

शाहरुख खानच्या लेकाची पुन्हा कमाल; ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’च्या सीझन २ची कथा स्वतः लिहिणार!

Asian Games 2026: मनप्रीत, गुलवीर सिंग, बारानिका यांनी इतिहास घडवला! दिवसभरात १ सुवर्ण, दोन रौप्य अन् ३ कांस्यपदकांची कमाई

Maharashtra Ganesh Visarjan Live: पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणरायाला निरोप

डीपफेक फोटो प्रकरणी सीजेपीच्या दीपके, दास आणि रांका यांच्याकडे मागितले स्पष्टीकरण; दिल्ली उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी

SCROLL FOR NEXT