Pune NCP Esakal
पुणे

Pune NCP : कार्यकर्त्यांना निवडावे लागणार शरद पवार किंवा अजित पवार? शरद पवार गटाचं महत्त्वाचं पाऊल

शरद पवार गटाने उचललं महत्त्वाचं पाऊल

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडल्या. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह ८ नेत्यांनी शिवसेना-भाजप सरकारला पाठिंबा दिला. त्यानंतर राष्ट्रवादीत मोठी फुट पडली. त्यानंतर शरद पवारांनी आपली भुमिका स्पष्ट केली आहे. मी भाजपसोबत जाणार नाही असं शरद पवारांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.

त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले. राष्ट्रवादीतील बडे नेते अजित पवार यांच्या सोबत आहेत, तर इतर नेते शरद पवार यांच्यासोबत उभे आहेत. आता राष्ट्रवादी कोणाची हा चेंडू आता निवडणूक आयोगासमोर आहे. अशातच पक्षाची पुर्नबांधणी करण्यासाठी दोन्ही गट प्रयत्न करत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नक्की कोणाचा नेते, कार्यकर्ते कोणाच्या सोबत आहेत यासाठी पक्षांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

पुणे शहरात शरद पवारांच्यासोबत आपण आहोत हे सांगण्यासाठी कोथरूड विधानसभा मतदारसंघात 'मी शरद मित्र' या नावाखाली सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष स्वप्निल दुधाने यांनी या अभियानाची सुरुवात केली आहे.

आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभेच्या खासदार वंदणा चव्हाण यांच्या हस्ते या अभियानाची सुरुवात होणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून पुणे शहरातील किती कार्यकर्ते शरद पवारांसोबत आहेत यासंबधीचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

पुण्यातील कोथरूड परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून नवीन अभियान सुरु करण्यात आला आहे, 'आम्ही शरदमित्र' या नावाने नोंदणी करण्यात येणार आहे. पुण्यातील कोथरूड भागातून सदस्य नोंदणीचा शुभारंभ आज करण्यात आला आहे. खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. जास्तीत जास्त सदस्यांची नोंदणी करून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचं अभियान होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT