Leakage of MNGL gas pipeline two-wheele, along with two women caught fire pune
Leakage of MNGL gas pipeline two-wheele, along with two women caught fire pune  sakal
पुणे

MNGL चा हलगर्जीपणा दोन महिलांच्या जीवावर बेतला असता...

विठ्ठल तांबे

धायरी : सिंहगड रस्ता परिसरात संतोष हॉल समोर मुख्य रस्त्यावर एमएनजिएल गॅस पाईप लाईनची गळती झाल्याची घटना आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. घटने मध्ये रस्त्यावर असणारी एक दुचाकी वर बसलेल्या दोन महिलांसहित दुचाकीने पेट घेतला. पेट घेतल्या नंतर काही वेळात  चालक महिलेच्या लक्षात आले. तोपर्यंत दुचाकी काही प्रमाणात पेटली आणि चालक महिलेच्या  पायाला आणि हाताला आगीच्या झळा लागल्याने महिला जखमी झाली .तर दुसरी महिला गाडी सोडून बाजूला आल्याने मोठा अनर्थ टळला परंतु गाडी जळत होती. सदरील घटनेत जखमी झालेल्या श्रेया गोरे ,सुमेधा गोरे (रा.वडगाव )यांना जवळील  खाजगी रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले. घटना घडल्यानंतर एम एन जि एल कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले परंतु जखमी महिलेला पाहण्यासाठी हॉस्पिटल मध्ये जाण्याची जरा सुद्धा तसदी घेतली नाही.

स्थानिक आजूबाजूच्या दुकानदारांनी पुढे येऊन जळत असलेल्या गाडीवर पाणी टाकून आग आटोक्यात आणली .त्यानंतर काही वेळाने घटनास्थळी अग्निशमन आणि सिंहगड पोलिस दाखल झाले.त्याच वेळी घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली परंतु वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सिंहगड वाहतूक विभाग कर्मचारी उशिरा घटनास्थळी पोहोचले.

एमएनजिएल च्या निष्काळजी पणामुळे नागरिकांचा जीव धोक्यात येत आहे. स्थानिक दुकानदार व नागरिकांनी वारंवार तक्रार देऊन ही यावरती एम एन जि एल कुठल्या प्रकारची दखल घेत नसल्याचे स्थानिक दुकानदार पदचारी नागरिक यांनी सांगितले तसेच याच ठिकाणचा एम एन जि एल चा व्हॉल्व मागील अनेक दिवसांपासून गॅस गळती होत असल्याची नागरिकांनी सांगितले. परंतु एम एन जि एल चा आडमुठेपणा कमी होताना दिसत नाही यापूर्वी देखील अनेक ठिकाणी अशा घटना घडलेल्या आढळून आल्या आहेत.

"अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नये यासाठी एम एन जि एल ए वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक आहे. कुठल्याही नागरिकांच्या जीवाशी खेळ होता कामा कामा नये. एम एन जि एल च्या आशा वागणुकी विरोधात आम आदमी पार्टी कडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला".

-श्रीकांत चांदणे-अध्यक्ष आप खडकवासला मतदारसंघ.

मागील चार ते पाच दिवसांपासून एम एन जि एल एम एल सी संपर्क करत असून वारंवार याबाबत तक्रार करत आहोत .परंतु एम एन जी एल टोलवाटोलवीची उत्तरे देत असून, एम एन जि एल चे अधिकारी येऊन उपायोजना न करताच निघून जातात. एम एन जि एल च्या हलगर्जीपणामुळे पादचारी नागरिक व आमच्यासारख्या दुकानदारांच्या जीवावर बेतू शकते.

-अनिल इंगळे-दुकानदार संतोष हॉल आनंद नगर..

"घडलेली घटना दुर्दैवी आहे .एम एन जी एल ने वेळोवेळी दुरुस्ती करणे गरजेचे आहे. अश्या घटना वारंवार घडूनये याची दक्षता एम एन जी एल ने घ्यावी. नागरिकांच्या जीवाशी खेळू नये."

-शैलेश संखे-वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सिंहगड रस्ता पोलीस स्टेशन..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: उज्ज्वल निकम यांना भाजपकडून मुंबई उत्तर-मध्यमधून उमेदवारी जाहीर; पुनम महाजन यांचा पत्ता कट

Shashikant Shinde: मार्केट FSI घोटाळा प्रकरणी शशिकांत शिंदेंवर गुन्हा दाखल; निवडणुकीच्या तोंडावर कारवाईची शक्यता

Latest Marathi News Live Update: पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे दीर्घ आजाराने निधन

Hemant Soren : हेमंत सोरेन यांना धक्का! ईडी कोर्टाने फेटाळला जामीन अर्ज; काय आहे प्रकरण?

Lok Sabha Election : ....म्हणून श्रीकांत शिंदेंना लोकसभेत पाठवणे गरजेचे; रामदास आठवलेंचे उल्हासनगरात आवाहन

SCROLL FOR NEXT