Leaving reservation of Indapur Municipal Council Sakal
पुणे

इंदापूर नगरपरिषदेची आरक्षण सोडत जाहिर

महिलांसाठी १० जागी आरक्षण

डॉ. संदेश शहा

इंदापूर - इंदापूर नगरपरिषद सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक २०२२ आरक्षण सोडत नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय भवन येथे सोमवार दि. १३ जून रोजी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. तहसीलदार श्रीकांत पाटील, नगरपरिषद मुख्याधिकारी रामराजे कापरे, सभा अधीक्षक गजानन पुंडे, भरत शहा, अशोक इजगुडे, शकील सय्यद, बाळासाहेब ढवळे, प्रा. कृष्णाजी ताटे, शिवाजी मखरे, संदीपान कडवळे, अनिल पवार, सागर पवार, महादेव लोखंडे यावेळी उपस्थित होते. यावेळी अनुसूचित जाती आरक्षण सोडतीत तीन राखीव जागांसाठी चैतन्य राजेंद्र धोत्रे या विद्यार्थ्यांच्या हातून सोडतीच्या चिठ्ठया काढण्यात आल्या.

इंदापूर नगरपरिषदेचे प्रभाग क्रमांक १, ९, १० अनुसूचित जाती साठी आरक्षित असून त्यापैकी १ अ व ९ अ हे अनुसूचित महिला आरक्षित झाले आहे तसेच सर्वसाधारण महिलांसाठी २ अ,३ अ,४ अ,५ अ,६ अ,७ अ,८ अ,१० ब आरक्षित झाले आहेत. इंदापूर नगरपरिषदेच्या १० प्रभागातील एकूण २० जागांपैकी १० जागा महिलांसाठी राखीव असतील.

या आरक्षण सोडती नुसार निम्म्या जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत मात्र सर्व साधारण जागेवरून सुद्धा महिला उभ्या राहू शकतात. त्यामुळे यंदा पुन्हा नगरपरिषदेवर महिला राज येण्याची शक्यता आहे. यंदा नगराध्यक्षपदी निवडून येण्यासाठी जनते ऐवजी नगरसेवकांमधून संधी मिळणार असल्याने नगरसेवकांना महत्त्व प्राप्त झाले आहे. यासंदर्भात नगरपरिषद सत्ताधारी गटाचे प्रमुख भरत शहा म्हणाले,या सोडतीचा फायदाआम्हाला होणार आहे कारण आम्ही प्रामाणिकपणे पाच वर्ष जनतेची सेवा केली आहे. त्यामुळे जनतेचा आमच्यावर विश्वास आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे म्हणाले, सामान्य प्रशासन राज्य मंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या माध्यमातून शहरात कोट्यावधी रुपयांची कामे झाली आहेत. त्यात आरक्षण देखील व्यवस्थित पडले आहे. त्यामुळे यंदा नगरपरिषदेवर निश्चित आमचीच सत्ता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT