पुणे

केळघर न्यायालय कार्यक्रम

CD

बिभवीत कायदेविषयक जनजागृती

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शाळेमध्ये शिबिर उत्साहात

केळघर, ता. ३ : सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय, मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशानुसार मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन मेढा न्यायालयाचे न्यायाधीश डॉ. विक्रम आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद शाळा, बिभवी येथे झाले.
यावेळी न्यायाधीश डॉ. आव्हाड म्हणाले, ‘‘मराठी भाषेला रुजवायचे झालेच, तर त्याची सुरुवात मराठी शाळेतूनच होते. तिथे मराठी भाषेला समृद्ध करणाऱ्या कवींचा, लेखकांचा उदय त्याच शाळेतून होतो. कवी वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या निमित्ताने साजरा केला जाणारा हा दिवस आहे.’’
मुख्याध्यापक अशोक लकडे यांनी सूत्रसंचालन केले. जावळी तालुका वकील संघाच्या सदस्या एन. एस. पवार यांनी कुसुमाग्रज यांच्या आठवणी व कवितांना उजाळा दिला. ए. के. शेटे यांनी मुलांना इंग्रजी शब्दांना मराठी भाषेतील समान शब्दांची ओळख करून दिली. यावेळी लेखिका, शिक्षिका जयश्री माजगावकर यांनी मार्गदर्शन केले. दीपाली दुंदळे यांनी आभार मानले.
कार्यक्रमास जावळी तालुका विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. विक्रम आव्हाड, तसेच ॲड. एन. एस. पवार, ॲड. ए. के. शेटे, जयश्री माजगावकर, सरपंच संतोष बांदल, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जाधव, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप देशमुख, मुख्याध्यापक अशोक लकडे, तसेच विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी उपस्थित होते.
-----------------------------
01412
बिभवी : येथील शाळेत मार्गदर्शन करताना डॉ. विक्रम आव्हाड. त्या वेळी अशोक लकडे, संतोष बांदल, राजेंद्र जाधव आदी.
-----------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Crime : बारामती तालुका पोलिसांनी प्रेमी युगुलाला लुटणा-या तिघांना काही तासात केले गजाआड....

Mathura Holika Dahan: जळत्या होळीमध्ये चालतो माणूस; मथुरेतील 'या परंपरेमागचं रहस्य काय? ४५ दिवसही करतो अन्नत्याग

ISRO मध्ये वैज्ञानिक असल्याचे सांगत लग्नाचं आमिष; पुण्यातील महिलेकडून ४२ लाख रुपये उकळले...

IND vs ENG, Semi: भारताने इंग्लंडविरुद्ध कोणती Playing XI खेळवावी? रवी शास्त्री, रिकी पाँटिंग यांचा सल्ला; म्हणाले, अभिषेकला तर...

विकी कौशल चिमुकलीच्या चक्क पडला पाया! स्टेजवरचा तो क्षण पाहून सगळेच झाले भावूक, Viral Video

SCROLL FOR NEXT