SLC26B29954
लिंबाचे संग्रहित छायाचित्र
उन्हाळ्याच्या दुप्पट पावसाळ्यात लिंबाचा भाव
घाऊक बाजारात १६० रुपये किलो; किरकोळ बाजारात दहाला एक
सकाळ वृत्तसेवा
उ.सोलापूर, ता. ९ : दुष्काळाचा फटका लिंबू उत्पादक पट्ट्याला बसल्याने बाजारातील आवक मोठ्या प्रमाणात रोडावली आहे. परिणामी घाऊक बाजारात लिंबाचे दर प्रति किलो १६० रुपयांपर्यंत गेले असून किरकोळ बाजारात दहाला एक लिंबू अशी विक्री होत आहे. जिल्ह्यातील लिंबू पट्ट्यात पावसाने दिलेली ओढ दरवाढीस कारणीभूत ठरली आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास भविष्यात लिंबाची आवक आणखी मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील अक्कलकोट परिसरातील शिरवळ, मोहोळ परिसरातील अंकोली, तसेच बार्शी तालुक्यातील चिखर्डे व मालवंडी या लिंबू उत्पादक पट्ट्याला अवर्षणाचा मोठा फटका बसला आहे. आतापर्यंत एकही दमदार पाऊस न झाल्याने लिंबाच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे. सध्या बाजारातील आवक उन्हाळ्याच्या तुलनेत कमी झाली असून त्याचा परिणाम दरावर झाला आहे. घाऊक बाजारात लिंबाचे कमाल दर प्रतिकिलो १६० रुपयांपर्यंत गेले असून सरासरी दर १०० रुपये प्रति किलोपर्यंत आहेत. उन्हाळ्याच्या तुलनेत दरात जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. किरकोळ बाजारातही चढ्या दराने विक्री होत असून मंडईत सध्या दहा रुपयांना एक लिंबू असा दर आहे. सध्या जिल्हा भीषण दुष्काळाच्या छायेत आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास लिंबू बागा जगवणे अशक्य होऊन भविष्यात बाजारातील आवक मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.
कोट
गेल्या वर्षी २० टन, तर आता वीस क्विंटलसुद्धा नाही
गेल्या वर्षी ११ सप्टेंबर रोजी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात लिंबाची २० टनांहून अधिक आवक झाली होती. तर शुक्रवारी (११ सप्टेंबर) बाजार समितीत अवघी १६ क्विंटल ८२ किलो लिंबू विक्रीसाठी दाखल झाले होते. गेल्या वर्षी याच दिवशी लिंबाला सरासरी दहा रुपये प्रति किलो दर मिळाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.