leopard news  sakal
पुणे

Pune News : आळ्यात दुसरा बिबट्या जेरबंद; माणिकडोह बिबट निवारण केंद्रात रवानगी

सदर बिबट्याला माणिक डोह येथील बिबट निवारण केंद्रात हलवण्यात आले असल्याची माहिती वन विभागाच्या वतीने देण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

राजेश कणसे

आळे (ता.जुन्नर) बालकावर हल्ला करून ठार केल्याची घटना घडल्याने वन विभागाने या ठिकाणी १६ पिंजरे लावले होते. या पिंजऱ्यात मंगळवार दि.१० रोजी पहाटेच्या सुमारास एक बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले होते तर दुसरा बिबट्या रविवार दि.१४ रात्री पुन्हा दुसरा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. सदर बिबट्याला माणिक डोह येथील बिबट निवारण केंद्रात हलवण्यात आले असल्याची माहिती वन विभागाच्या वतीने देण्यात आली.

या बाबत सविस्तर माहिती अशी की आळे (ता.जुन्नर) येथील‌ तितर मळ्यातील शिवांश अमोल भुजबळ या तीन वर्षीय मुलावर बिबट्याने सोमवार दि.०९ रोजी हल्ला करून ठार केल्यानंतर मंगळवार (दि.१०) वनविभागाने घटनास्थळी व परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी १५ ठिकाणी पिंजरे लावले होते तर १५ ठिकाणी ट्रॅप कॅमेरा बसवण्यात आले होते. तोच नरभक्षक बिबट्या आहे का या बाबत माहिती मिळाली नाही.

दरम्यान जुन्नर तालुक्यात बिबट्यांची वाढती संख्या व आळे गावात बिबट्याच्या हल्ल्याने बालकाचा झालेला मृत्यू तसेच आळे गावात बागायती व ऊसाचे क्षेत्र जास्त असल्याने तसेच अनेक वेळा दुचाकीस्वारांवर,पाळीव प्राण्यांवर हल्ले होत असुन यासाठी शासनाने यावर ठोस पावले उचलण्यासाठी

त्याच्यावर तातडीने उपाययोजना करावा यासाठी आळे ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच प्रितम काळे,उपसरपंच ॲड विजय कु-हाडे व सर्व सदस्य यांच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजीत पवार,वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांणा निवेदन दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

'आलमट्टी'ची उंची वाढविल्यास सांगली-कोल्हापूरला धोका नाही, महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेतंय; आमदाराचं मोठं विधान

Latest Maharashtra News Updates : ठाकरे मेळाव्यावर मुनगंटीवारांची स्पष्टोक्ती

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

SCROLL FOR NEXT