Bibtya 
पुणे

दैव बलवत्तर म्हणून शेतकरी बचावला... 

मीननाथ पानसरे

आपटाळे (पुणे) : वडज (ता. जुन्नर) येथील नंदनवाडी परिसरात वीजपंप सुरू करण्यासाठी गेलेल्या शांताराम भीमाजी गाडेकर (वय 65) या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला. त्यात ते जखमी झाले आहेत. दैव बलवत्तर म्हणून ते या हल्ल्यातून बचावले.

गाडेकर यांच्या घरापासून अवघ्या पन्नास फुटाच्या अंतरावर ओढ्याजवळ विहीर आहे. ते सोमवारी (ता. 9) सकाळी साडेसहा वाजता विहिरीवरील वीजपंप सुरू करण्यासाठी गेले होते. त्या वेळी अचानक समोरासमोर बिबट्याचा आणि त्यांचा सामना झाला. बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवत त्यांच्या हाताला चावा घेतला; तर डोक्‍याला पायाच्या नखांनी जखमा केल्या. गाडेकर यांनी धाडस दाखवत जोरजोरात आरडाओरडा केला. त्यामुळे त्यांची मुले धावत घटनास्थळी आली.

आरडाओरडा झाल्याने बिबट्याने तेथून धूम ठोकली. सुदैवाने या प्राणघातक हल्ल्यातून गाडेकर बचावले. त्यांना वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे, वनपाल कृष्णा दिघे, वनरक्षक त्र्यंबक जगताप व ग्रामस्थांनी जुन्नर येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. 

दरम्यान, ग्रामस्थांच्या मागणीनुसार बिबट्याला जेरबंद करण्यासाठी घटनास्थळावर वनविभागाने तातडीने पिंजरा लावला आहे. शेतकऱ्यांनी पहाटे व रात्री शेतात जाताना समूहाने जावे, रात्रीच्या वेळी बॅटरीचा वापर करावा, गाणी वाजवावी, या स्वरूपाची काळजी घेण्याचे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे यांनी केले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

First Solo Trip Tips: पहिल्यांदाच सोलो ट्रिपला जाताय? मग हे ‘गोल्डन रूल्स’ नक्की लक्षात ठेवा!

Marathi News Live Updates : तानसा तलावात ९८.३७ टक्के पाणीसाठा, इतर तलावांमध्ये किती?

Ram Mandir Trust: राम मंदिर ट्रस्टचे महासचिव स्वामी गोविंद देवगिरीजींचा महाराष्ट्र दौरा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन सुरू

Alandi Spiritual Visit: आळंदीत चैतन्यमय वातावरण; संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे दर्शन घेत बिट्टा यांचे गौरवोद्गार

SCROLL FOR NEXT