पुणे

पिंपरखेड येथे अश्रूंनी ओथंबलेल्या घरांना आधार

CD

टाकळी हाजी, ता. २ : पिंपरखेड (ता. शिरूर) येथे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला होता, या तिन्ही मृत्यू झालेल्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख असे १५ लाख रुपयांची आर्थिक मदत शिवसेनेच्या वतीने देण्यात आली.
पिंपरखेड तालुका शिरूर येथे रोहन विलास बोंबे, शिवन्या शैलेश बोंबे, शेजारील जांबूत येथील भागूबाई जाधव या तिन्ही कुटुंबीयांना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी शिवसेना पक्ष निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी आमदार शरद सोनवणे, युवा सेनेचे मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे, वनविभागाचे वनरक्षक लहू केसकर, महेंद्र दाते, उपसरपंच विकास वरे, माऊली ढोमे, जयवंत बोंबे तसेच इतरही कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीडित कुटुंबीयांबरोबर व्हिडिओकॉलद्वारे संपर्क साधला आणि विचारपूस केली तसेच व्हिडिओकॉलद्वारे बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, यापुढे देखील आपणास काही मदत लागल्यास त्वरित माझ्यापर्यंत संपर्क करा किंवा आमच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क करा तुम्हाला यापुढे कुठेही अडचणी येऊ देणार नाही, असे आश्वासन देखील त्यांनी पीडित कुटुंबीयांना दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Shortage: पोळी, भाकरीलाही इंधनटंचाईचे ‘चटके’; प्रतिनग दोन ते पाच रुपयांनी दरवाढ

Ahilyanagar News: गुरुजींची बढतीसाठी खटपट! अहिल्यानगर जिल्हा परिषदेत एजंटांनी टाकले गळ, नियमातील संदिग्धतेने फावले..

Harish Rana Case: १३ वर्षांपूर्वी हरीश राणाला काय झालेलं? परदेशात विषारी इंजेक्शन टोचतात; पण भारतात इच्छामरण कसं दिलं जातं? कायदा काय सांगतो?

"खरे हिरो बाबाच!" शिवम दुबेने T20 World Cup चे मेडल घातलं वडिलांच्या गळ्यात; पाहा Video

Female Foeticide Law : 7 ते 10 वर्षांची जेल आणि थेट कारवाई! स्त्रीभ्रूण हत्येचा कलंक पुसण्यासाठी सरकारने आखला 'हा' प्लॅन; आरोग्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

SCROLL FOR NEXT