पुणे

मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणावर बिबट्याची झडप

CD

कडूस, ता. २५ :  खेड तालुक्यातील गारगोटवाडीत मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणावर बिबट्याने हल्ला केल्याने परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे. काशिनाथ भांगे असे या तरुणाचे नाव असून, दैव बलवत्तर म्हणून तो बचावला. या घटनेमुळे नागरिकांच्या जीविताचा प्रश्‍न ऐरणीवर आला असून, कुंभकर्णी झोपेत असलेल्या वनविभागाने तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
गारगोटवाडी येथील काशिनाथ भांगे हे आज सकाळी सहाच्या सुमारास मुसळेवाडी रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. या वेळी समोरून काळ बनून आलेल्या बिबट्याला पाहून ते झाडाआड लपले. बिबट्या गेल्याचा समज होताच त्यांनी घराकडे धाव घेतली, मात्र दबा धरून बसलेल्या बिबट्याने डरकाळी फोडत त्यांचा पाठलाग सुरू केला.
जीव वाचविण्यासाठी धावताना भांगे जमिनीवर कोसळले. बिबट्याने त्यांच्या पायावर झडप घालण्याचा प्रयत्न करताच त्यांनी आरडाओरडा केला. आवाज ऐकून लक्ष्मण भांगे मदतीला धावल्याने बिबट्याने बाजूच्या झाडीत धूम ठोकली. या थरारक घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, वनविभागाने केवळ कागदी घोडे न नाचवता बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करावा; अन्यथा होणाऱ्या परिणामांना विभागच जबाबदार राहील, असा संतप्त इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

MBBS Admission 2026: एमबीबीएस बीडीएस प्रवेश २०२६: प्रवेश निश्चित करण्यासाठी १४ ऑक्टोबरपर्यंत मुदत, ११ हजार ३४० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

Parner Congress: पारनेर काँग्रेसमध्ये राजीनामासत्र! तालुकाध्यक्ष संभाजी रोहोकलेंसह संपूर्ण कार्यकारिणीचा राजीनामा, नेमकं काय कारण?

SCROLL FOR NEXT