Pune News : मोटारसायकलवरून जात असलेल्या तरुणावर बिबट्याचा अचानक हल्ला Sakal
पुणे

Pune News : मोटारसायकलवरून जात असलेल्या तरुणावर बिबट्याचा अचानक हल्ला

कांदळी येथील सुतारठिके वस्ती येथे मोटारसायकलवरून जात असलेल्या तरुणावर बिबट्याने हल्ला केल्यामुळे हा तरुण गंभीर जखमी झाला होता या तरुणाचा मंगळवारी रात्री उपचरादरम्यान मृत्यू झाला

सकाळ वृत्तसेवा

- राजेश कणसे

आळेफाटा : कांदळी येथील सुतारठिके वस्ती येथे मोटारसायकलवरून जात असलेल्या तरुणावर बिबट्याने हल्ला केल्यामुळे हा तरुण गंभीर जखमी झाला होता या तरुणाचा मंगळवारी रात्री उपचरादरम्यान मृत्यू झाला या तरुणाची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली मंगेश रामदास गुंजाळ (वय २६ वर्ष रा. कांदळी ता जुन्नर जि पुणे) असे या तरुणाचे नाव आहे.

याबाबत माहिती कांदळी येथील मंगेश गुंजाळ हा रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सुतारठिके वस्तीवर असलेल्या डेअरी मध्ये दुध घालण्यासाठी मोटारसायकल वरून जात असताना रस्त्याच्या बाजूला दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानकपणे मोटारसायकलवर उडी मारली व मंगेश मोटारसायकल घेऊन खाली पडला

याचवेळी संतोष गुंजाळ व अक्षय महाले हे दोघेजण मंगेश याच्या पाठीमागून मोटारसायकलवर येत होते मंगेश याच्यावर बिबट्याचा हल्ला होत असल्याचे दिसताच त्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने या ठिकाणाहुन पळ काढला या घटनेत मंगेश याच्या डोक्याला गंभीर मार लागला होता.

त्याच्यावर आळेफाटा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते त्याच्या मेंदूवर एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती मात्र उपचारास प्रतिसाद न मिळाल्यामुळे या तरुणाचा मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मुत्यू झाला आहे.

मंगेश गुंजाळ हा युवक कांदळी येथील आनंदनगर मध्ये राहत होता. घरची परिस्थिती अतिशय बेताची होती वडिलांचे वर्षापूर्वीच निधन झाले आहे. वीस वर्षांपूर्वीच आईचेही निधन झाले असून मंगेशला चार बहिणी असून तीन बहिणी विवाहित आहे.

शेतात कष्ट व मोलमजुरी करून कुटुंबाचा चरितार्थ चालत होता परंतु मंगेश वर बिबट्याने हल्ला केला व यामध्ये त्याला आपले प्राण गमवावे लागल्याने कांदळी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान मंगेश याचा मुत्यूला बिबटयाच कारणीभुत असुन बिबट्याने केलेल्या हल्ल्याने मंगेश हा दुचाकीवरून खाली पडुन गंभीर जखमी होऊन उपचार घेत असताना निधन झाले आहे त्याच्या परीवारास वन विभागाने भरपाई देण्यात यावी अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

Successful Investment: बाबो! ही महिला चक्क पार्किंगमधून कमावते लाखो रुपये; नेमका काय आहे बिझनेस?

अंतराळात तयार होणार स्कॉच व्हिस्की! कुणाला प्यायला मिळणार? ‘स्पेस पफिन’ मिशन नेमकं काय?

Latest Marathi News Live Update : वकिलांशी कथित गैरवर्तन; सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून निषेध

FDA Action: खाद्यतेलाच्या साठ्यांवर छापा, 'एफडीए'च्या कारवाईत १.२८ कोटींचा साठा जप्त

SCROLL FOR NEXT