Leopard attack in Patas cow killed and calf injured pune Sakal
पुणे

Daund News : पाटस येथे बिबट्याचा धुमाकूळ,हल्ल्यात दुभत्या गाईचा मृत्यू तर वासरू जखमी

आजपर्यंत बिबट्यांच्या हल्ल्यात अनेक पाळीव प्राण्यांचा बळी गेला आहे.सध्या दुष्काळ सदृश परिस्थितीमुळे वन्यजीवांची पाण्यासाठी भटकंती वाढली आहे

अमर परदेशी

पाटस :दौंड तालुक्यात बिबटयाची दहशत वाढत चालली आहे.पाटस येथे सोमवारी (ता.१३) बिबट्याने मध्यरात्री धुमाकूळ घातला.यावेळी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका दुभत्या होस्टेन गाईचा जागीच मृत्यू झाला.तसेच एक वासरू जखमी झाल्याचा प्रकार घडला.वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

मागील काही दिवसांपासून दौंड तालुक्यातील अनेक भागात बिबट्यांचे अस्तित्व दिसून येत आहे.आजपर्यंत बिबट्यांच्या हल्ल्यात अनेक पाळीव प्राण्यांचा बळी गेला आहे.सध्या दुष्काळ सदृश परिस्थितीमुळे वन्यजीवांची पाण्यासाठी भटकंती वाढली आहे.बिबट्याचा सुद्धा बागायती भागात वावर वाढला आहे.काही महिन्यापूर्वी बिबट्याने नानगाव येथे एका शेत मजुरावर हल्ला केल्याची घटना घडली होती.

बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे.पाटस येथील मोहितेवस्ती भागात सोमवारी बिबट्याने अक्षरशः उच्छाद मांडला.वस्तीत सतीश साळुंखे यांचे राहते घर व गुरांचा गोठा आहे.सोमवारी मध्यरात्री बिबट्याने घराच्या बाजूला बांधलेल्या एका दुभत्या होस्टेन गाईवर हल्ला केला.बिबट्याने गाईचा काही भाग अक्षरशः तोडून खाल्ला.यामध्ये गाईचा जगीच मृत्यू झाला.शिवाय बाजूच्या वासरावर हल्ला केला यामध्ये वासरू जखमी झाले.सकाळी साळुंके हे झोपेतून उठून घराबाहेर येताच त्यांना गाई रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेली दिसली.त्यांनी जवळ जाऊन खात्री केली असता गाईचा मृत्यू झाल्याचे त्यांना समजले.बाजूला एका वन्यप्राण्याचे ठसे आढळून आले.

नागरिकांनी घटनेची वनविभागाला माहिती दिली.वरवंड वनपरिमंडल विभागाचे वनरक्षक रामेश्वर तेलंगरे व वनकर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.त्यांनी मृत गाईवर झालेल्या हल्ल्याची पाहणी केली. यावेळी शिवारात बिबट्याच्या ठशांची पाहणी केली.यावेळी साळुंखे, राजेंद्र मोहिते आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

मृत गाई ही चांगल्या प्रतीची होस्टेन गाई होती.ती काही दिवसापूर्वीच व्याली असून ती दूध देत होती.बिबट्याच्या हल्ल्यात गाईचा मृत झाल्याने शेतकऱ्याचे आथिर्क मोठे नुकसान झाले असून वनविभागाकडून तत्काळ नुकसान भरपाई मिळण्याची।मागणी राजेंद्र मोहिते यांनी केली.

परिसरात बिबट्याचे अस्तित्व दिसून येत असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे.पाळीव प्राण्यांना सुरक्षित ठिकाणी बांधण्याचे आवाहन वनरक्षक तेलंगरे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT