पुणे

बिबट्याच्या हल्ल्यात बोरीत मुलगी जखमी

CD

आळेफाटा, ता. २२ : जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक गावठाणातील नंदीवाले वस्ती येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात १७ वर्षीय जयश्री दगडू पवार ही मुलगी जखमी झाली. मंगळवारी (ता. २०) रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास ही घटना घडली. तिच्या पायाला जखम झाली असून, उपचारानंतर बुधवारी सायंकाळी तिला घरी सोडण्यात आले.
जयश्री पवार ही मंगळवारी रात्री घराबाहेर आली असताना परिसरात दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली. ग्रामस्थांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. जखमी जयश्री हिला उपचारासाठी नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार घेतल्यानंतर तिची प्रकृती सुधारल्याने तिला घरी सोडण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वनपाल गणेश बागडे आणि ऋषिकेश गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली.

ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
गावठाणातील भरवस्तीतच बिबट्याने हल्ला केल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेषतः महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. वनविभागाने परिसरात नियमित गस्त घालावी, बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवावे आणि आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. गरजेनुसार पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitesh Karale : पदवीधर निवडणुकीपूर्वी नितेश कराळे गुरुजींना धक्का; राष्ट्रवादीतून सहा वर्षांसाठी हकालपट्टी, नेमकं काय घडलं?

Mumbai Local : कसारा मार्गावरील प्रवाशांसाठी खुशखबर! गर्दीचा ताण कमी होणार; १५ डब्यांच्या लोकल धावणार

Latest Marathi News Live Update : पहिल्या टी-२० सामन्यात भारताकडून न्यूझीलंड गारद

Shiva Sharma Death Case : २२०० किमीचा थरार, १० दिवस पोलिसांना चकवा; नेपाळ ते नागपूर पळणाऱ्या मॉडेल श्रद्धा दुबेला अखेर बेड्या

Pune News: ‘नशामुक्त भारत’साठी समाजाने पुढे यावे; पोलिस आयुक्त अमितेश कुमार

SCROLL FOR NEXT