पुणे

बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षीय चिमुकली गंभीर जखमी

CD

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली जखमी
अकोले, ता. २० : तालुक्यातील कुंभेफळ येथे बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षीय चिमुकली गंभीर जखमी झाली. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
श्रीशा वैभव शिंदे (वय ३) असे जखमी बालिकेचे नाव आहे. सायंकाळी सातच्या सुमारास ती घरासमोर खेळत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक तिच्यावर झडप घातली. चिमुकलीच्या आरडाओरड्यानंतर आजूबाजूचे नागरिक धावून आले. ग्रामस्थांनी आरडाओरडा करताच बिबट्याने तेथून पळ काढला. या हल्ल्यात बालिकेच्या हाताला, पाठीवर व मानेजवळ गंभीर जखमा झाल्या आहेत. तिला तत्काळ सुगाव खुर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी अकोले येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. वन परिक्षेत्र अधिकारी आनंद पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिसराची पाहणी करून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. कुंभेफळ परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Megablock: पावसाचा हाहाकार अन् लोकलचा खोळंबा! मुंबईकरांनो वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, 'या' मार्गावर मेगाब्लॉक

Maharashtra Farmers: पीकविमा योजनेत डिजिटल सर्वेक्षण बंधनकारक, चार प्रमुख बदल; फसवणूक केल्यास ५ वर्षे कोणताच लाभ नाही

Marathi Live Updates : सुकळी खिंडीत पाण्याचा महासागर; गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Satara: कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार! धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक; १२ तासात ७८७ मिमी पाऊस

Cabinet Reshuffle: ते दोन केंद्रीय मंत्री कोण? भाजप कार्यालयात पोहोचताच राजीनाम्याच्या चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT