बिबट्याचा वावर  sakal
पुणे

पुणे: तीन वर्षाच्या बालकावर बिबट्याचा हल्ला

राजुरी येथील गव्हाळी मळ्यामधील एका लहान तीन वर्षाच्या बालकावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले आहे

सकाळ डिजिटल टीम

आळेफाटा : राजुरी येथील गव्हाळी मळ्यामधील एका लहान तीन वर्षाच्या बालकावर बिबट्याने हल्ला करून, जखमी केल्याची घटना रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार राजुरी (ता.जुन्नर) येथील गव्हाळी मळ्यातील रहात असलेले अक्षय चासकर यांचा तीन वर्षाचा लहान मुलगा वेद अक्षय चासकर (वय ३) अंगणात खेळत असताना, बिबटयाने अचानकपणे या बालकावर हल्ला करून त्या बालकास घराजवळच असलेल्या ऊसाच्या शेतात फरफटत नेले.

मुलाचा मोठा रडण्याचा आवाज आल्यानंतर घरातील लोक बाहेर आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी ऊसाच्या शेतात घेराव घालून, मोठा आरडाओरड केला. मोठा आवाज आल्याने बिबट्याने त्या मुलाला शेतात सोडून या ठिकाणाहून पळ काढला. स्थानिक नागरिकांनी या जखमी बालकाला आळेफाटा येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेले होते.

पंरतु हल्ला मोठ्या प्रमाणावर झाला असल्याने, या बालकाला पुणे या ठिकाणी पुढील उपचारासाठी हलवले आहे. दरम्यान आळेफाटा परिसरात दिवसेंदिवस बिबट्याचे हल्ले मोठ्या प्रमाणावर होत असुन, वनविभाग याकडे पुर्णपणे दुर्लक्ष करत आहे. या परिसरातील ग्रामस्थांनी राजुरी परिसरात पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : दिल्लीतील मद्य घोटाळ्याच्या आरोपातून निर्दोष मुक्ततेनंतर अरविंद केजरीवाल यांना अश्रू अनावर; म्हणाले- सत्याचाच विजय झाला

Satej Patil Hasan Mushrif Vinay Kore Alliance : सतेज पाटील, मुश्रीफ, विनय कोरे एकत्र येणार?, झेडपीतील पाडापाडीमुळे ‘गोकुळ’च्या राजकारणाला उकळी

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये ४०० कोटींच्या कथित अपहरण प्रकरणात मोठी घडामोड

प्रतीक्षा संपली ! स्टार प्लसचा बहुप्रतीक्षित शो "तारा" १० मार्चपासून रात्री ८ वाजता येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

Ramdas Athawale: मोदींचा सामना करणे ‘बच्चों का खेल नहीं’; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा राहुल गांधी यांना चिमटा

SCROLL FOR NEXT