Leopard Attack Sakal
पुणे

रेटवडी येथे बिबट्यांचा महिलांवर हल्ला

रेटवडी (ता. खेड) पठाणवस्ती व सतारकावस्ती येथे मंगळवार (दि. १०) रोजी सायंकाळी साडेसहा व आठ वाजता दिड तासांच्या फरकाने दोन महिलांवर दोन बिबट्यांनी हल्ले चढवल्याची घटना घडली.

सदाशिव आमराळे

रेटवडी (ता. खेड) पठाणवस्ती व सतारकावस्ती येथे मंगळवार (दि. १०) रोजी सायंकाळी साडेसहा व आठ वाजता दिड तासांच्या फरकाने दोन महिलांवर दोन बिबट्यांनी हल्ले चढवल्याची घटना घडली.

दावडी - रेटवडी (Retwadi) (ता. खेड) पठाणवस्ती व सतारकावस्ती येथे मंगळवार (दि. १०) रोजी सायंकाळी साडेसहा व आठ वाजता दिड तासांच्या फरकाने दोन महिलांवर (Women) दोन बिबट्यांनी हल्ले (Leopard Attack) चढवल्याची घटना घडली असुन, आतापर्यंतची बिबट्याने हल्ला करण्याची ही चौथी वेळ असुन बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

रेटवडीच्या पठाणवस्ती येथे रिजवणा अब्दुल पठाण या महिलेवर रस्त्याने एकट्या जात असताना बिबट्याने साडेसहाच्या दरम्यान हल्ला केला. हल्ला झाल्यावर ग्रामस्थांनी वनविभागास कळवले. राजगुरुनगरचे वनपरिक्षेत्र अधिकारी पी. एस. रौंधळ, वन परिमंडळ अधिकारी दत्तात्रय फापाळे, वनरक्षक शिवाजी राठोड संदीप अरुण व ढोले असे पथक पोहोचले. त्याठिकाणी पाहणी केली असता बिबट्या झुडुपात असल्याचे टॉर्चच्या उजेडात दिसुन आले. वनविभागाचे कर्मचारी व ग्रामस्थांनी मोठ्याने आरडाओरडा करून हुसकावण्याचा प्रयत्न केला तरीही बिबट्या जागेवरच उभा होता. त्याच वेळी आठ वाजता सतारकावस्ती येथे दुसऱ्या बिबट्याने महिलेवर हल्ला केल्याचे समजले.

सतारकावस्ती येथे रात्री आठचे सुमारास झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यात अरूणा संजय भालेकर ही महिला गंभीर जखमी झाली आहे. बिबट्याने तोंडावर व डोक्याला पंजाने मारून व चावा घेऊन गंभीर जखमी केले आहे. भालेकर यांना ग्रामस्थांनी तातडीने चांडोली येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले होते. मात्र डोक्याला झालेल्या जखमा खोल असुन जास्त रक्तस्त्राव झाल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी पुणे येथे ससून रूग्णालयात दाखल केले आहे. मंगळवारी घडलेल्या घटना ताज्या असतानाच बिबट्याने बुधवारी (दि. ११) सकाळी सहाचे सुमारास वाबळदरा येथे कांताराम रेटवडे या शेतकऱ्याचे कुत्रे खाल्ले.

रिजवणा अब्दुल पठाण ही महिला किरकोळ जखमी असल्याने त्यांना राजगुरूनगर येथील खाजगी रूग्णालयात उपचार करून घरी सोडले आहे. दरम्यान वनविभागाच्या वतीने वाबळदरा येथे पिंजरा लावण्यात आला अाहे. रेटवडी वन परिसरात बिबट्या तरस यांसारखे वन्य प्राणी आहेत तरी ग्रामस्थांनी सावधानता बाळगणे जरूरी आहे. रात्रीचे वेळी एकटे फिरू नये. एकटे असल्यावर मोबाईलवर मोठ्याने गाणी लावावीत व वनविभाग वेळोवेळी देत असलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन वन परिमंडळ अधिकारी दत्तात्रय फापाळे यांनी केले आहे. वारंवार होणाऱ्या बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे रेटवडी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असुन बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT