पुणे

दुचाकीस्वार महिलांवर बिबट्याची झडप

CD

कवठे येमाई, ता. ८ : रस्त्यालगतच्या उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने दुचाकीस्वार महिलांवर हल्ल्याचा प्रयत्न केल्याची थरारक घटना रविवारी (ता. ६) रात्रीच्या सुमारास पिंपरखेड (ता. शिरूर) येथील भागडी रस्त्यावरील बऱ्हाटेवस्ती परिसरात घडली. महिलांनी प्रसंगावधान राखत दुचाकी पुढे नेल्याने त्या थोडक्यात बचावल्या. मात्र, अचानक समोर आलेल्या बिबट्यामुळे गोंधळ उडाल्याने दुचाकी घसरून स्नेहा सुनील भोजणे जखमी झाल्या.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, भागडी (ता. आंबेगाव) येथील सुषमा भास्कर उंडे आणि स्नेहा सुनील भोजणे या दोघी रविवारी रात्री साडेसातच्या सुमारास दुचाकीवरून पिंपरखेडच्या दिशेने जात होत्या. बऱ्हाटेवस्ती परिसरात येताच रस्त्याच्या कडेला असलेल्या उसाच्या शेतातून अचानक बिबट्या बाहेर आला. त्याने थेट दुचाकीच्या दिशेने झेप घेत हल्ल्याचा प्रयत्न केला. यामुळे दोघीही भयभीत झाल्या. गोंधळलेल्या अवस्थेत दुचाकी पुढे नेत असताना घसरल्याने भोजणे जखमी झाल्या. त्यांच्यावर पिंपरखेड येथील खासगी दवाखान्यात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्या वेळी दोन बिबटे दिसून आल्याचे उंडे यांनी सांगितले. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीवर हल्ल्याचा प्रयत्न करणारा बिबट्या भविष्यात इतर नागरिकांवर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने वनविभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेत बिबट्याचा वावर असलेल्या भागाची तातडीने पाहणी करावी, आवश्यक ठिकाणी वाढीव पिंजरे लावावेत आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

पिंजरे लावूनही वावर कायम
पिंपरखेड परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर वाढला आहे. उसाच्या शेतांमध्ये बिबट्यांचा अधिवास असल्याने रात्रीच्या वेळी दुचाकीस्वार तसेच पायी जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांच्या मागणीनुसार वनविभागाने परिसरात पिंजरे लावले आहेत; मात्र अद्याप बिबट्या जेरबंद झालेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हवामानाचा अंदाज अन् पायलटनं फिरवला निर्णय; राहुल गांधींच्या विमानाला का करावं लागलं 'गो-अराउंड'? लँडिंगच्या १० मिनिटांपूर्वी काय घडलं?

Thalapathy Vijay Assembly Row : हनुवटीवर हात अन् MISA कायद्याचा संदर्भ; स्टॅलिन यांच्यावरील 'त्या' कृतीवर विधानसभेत गदारोळ का झाला? थलपथी विजय यांचं स्पष्टीकरण

२ वर्षाची झाली दुआ पादुकोण सिंह! रणवीर- दीपिकाने शेअर केले खास फोटो; अभिनेत्रीच्या बेबी बम्पने वेधलं लक्ष

Education Awards: डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्काराने स्वारातीमच्या दोन प्राध्यापकांचा गौरव

युद्धाचा भडका आणि जागतिक संकट, तरीही भारतीय अर्थव्यवस्था सुरक्षित कशी? PM मोदींनी स्पष्टच सांगितलं...

SCROLL FOR NEXT