पुणे

तळेगाव ढमढेरे येथे बिबट्याची दहशत

CD

तळेगाव ढमढेरे, ता. १७ : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील फणस मळा व माळी मळा येथे शेतकरी ज्ञानोबा संभाजी नरके यांच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून कुत्र्याला फस्त केले. रविवारी (ता. १७) मध्यरात्री व पहाटेच्या वेळी झालेल्या हल्ल्यांत बिबट्याने हा पाळीव कुत्रा ठार करून फस्त केला. विशेष म्हणजे कुत्र्याला फस्त केल्यानंतर नारळाच्या झाडावर दोन बिबटे चढल्याचे शेतकऱ्यांनी पाहिले. जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब नरके यांनी बिबट्यांविषयी वनविभागाला त्वरित माहिती दिली. परिसराची पाहणी करून योग्य त्या ठिकाणी पिंजरा लावावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. यापूर्वीही अनेक वेळा येथील वस्तीवर बिबट्याने पाळीव प्राण्यांवर हल्ले करून नुकसान केल्याचे नरके यांनी सांगितले. दरम्यान, तळेगाव ढमढेरे, धानोरे आदी परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून बिबट्याची दहशत कायम असल्याचे शेतकरी सांगत आहेत. बिबट्याला पकडण्यासाठी ठीकठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganesh Festival: पुण्यात गणेशोत्सवात स्पीकर निर्बंधांवर मंडळांचा आक्षेप! त्रास होणाऱ्यांना मंडळ पैसे द्यायला तयार, कार्यकर्त्यांची आक्रमक भूमिका

Toll News: नवीन Highway वर आता 3 महिने टोल नाही? सरकारचा टेस्टिंग प्लॅन काय?

Marathi News Live Updates : सीएनजी रिफिलिंग पंपावर ट्रकमध्ये झालेल्या स्फोटात तिघांचा मृत्यू

RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! ठेवींवरील व्याजदराबाबत बँकांना भेदभाव करता येणार नाही; एक ऑक्टोबरपासून देशभरात नवे नियम लागू

Pune News : दुबईहून दिल्लीला येत असलेला तरुण पुणे विमानतळावर बेपत्ता; विमाननगर पोलिसांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT