पुणे

जुन्नरच्या आदिवासी भागात बिबट्याची दहशत

CD

जुन्नर, ता. १० : तालुक्यातील अतिदुर्गम हातवीज परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला असून, गेल्या पंधरा दिवसांत दोन गाई आणि एका बैलाची शिकार केली आहे. या वाढत्या उपद्रवामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण असून, वनविभागाने तातडीने पिंजरा लावण्याची मागणी सरपंच महादू निर्मळ यांनी केली आहे. तालुक्यातील आंबे, हातवीज, हिवरे पठार आणि सुकाळवेढे या पठारी भागांत बिबट्याचा वावर वाढला आहे. या परिसरात दाट झाडी असल्याने बिबट्याला लपण्यासाठी अनुकूल जागा मिळते. अनेक शेतकऱ्यांकडे पक्के गोठे नसल्याने जनावरे अंगणात बांधली जातात, ज्याचा फायदा बिबट्या घेत आहे. हातवीज येथे झालेल्या नुकसानीमुळे स्थानिक शेतकरी हवालदिल झाले असून, वनविभागाने या हिंस्र प्राण्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Suryakumar Yadav Reaction: पुढच्या वर्षी आणखी जोमाने पुनरागमन करू... सूर्यकुमार पॅक अपनंतर काय म्हणाला? कोणावर खापर फोडले?

Rajat Patidar Reaction: खरं सांगायचं तर, आम्ही हा सामना जिंकण्यास पात्र नव्हतो; RCB चा विजय, तरीही रजत पाटीदार असं का म्हणाला?

IPL 2026 Playoff : मुंबई इंडियन्स स्पर्धेबाहेर! शेवटच्या षटकात थरार अन् RCBचा रोमहर्षक विजय; POINT TABLE मध्ये अव्वल स्थानी झेप

PM मोदींमुळे भारतात तेल-गॅस मिळतोय, आवश्यकतेनुसार वापराचं आवाहन योग्यच; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

RCB vs MI Live: तिलक वर्माची विकेट अन् रोहित शर्मा संतापला; मुंबई इंडियन्स कसेबसे सन्मानजनक धावांपर्यंत पोहोचले Video Viral

SCROLL FOR NEXT