Leopard
Leopard 
पुणे

महाळुंग्यात पिंजरा लावण्यास टाळाटाळ

सकाळवृत्तसेवा

महाळुंगे पडवळ - येथील फुलेवाडी येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेळी ठार झाली आहे. गेल्या १५ दिवसांतील बिबट्याने हल्ला केल्याची ही चौथी घटना घडली आहे. बैल, कालवड, मेंढ्या व शेळी या प्राण्यांवर हल्ला केल्यामुळे शेतकरी भयभीत झाले आहे. वनखात्याचे अधिकारी व कर्मचारी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यास टाळाटाळ करतात, अशी तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. 

महाळुंगे पडवळ- फुलेवाडी परिसरातील लक्ष्मीबाई विठ्ठल बनकर यांच्या शेळी बिबट्याने रविवारी (ता. ७) रात्री केलेल्या हल्ल्यात ठार झाली. कळंबचे वन परिमंडल अधिकारी सोमनाथ खुंटे यांच्या सूचनेनुसार महाळुंगे पडवळचे नियत क्षेत्र अधिकारी राजेंद्र गाढवे यांनी घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांच्या उपस्थितीत पंचनामा केला. सैदमळा येथे दिनकर किसनराव सैद यांच्या बैलावर, मधुकर सयाजी सैद यांच्या कालवडीवर, सुनील बबन सोलाट यांच्या शेळीवर, सोलाटमळा परिसरात मेंढपाळांच्या कळपावर हल्ला करून दोन मेंढ्या ठार केल्या आहेत. 

पशुपालक अडचणीत
महाळुंगे पडवळ परिसरात बिबट्याकडून वारंवार हल्ले होऊ लागल्यामुळे पशुपालक अडचणीत आले आहेत. सरपंच तुकाराम आवटे, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत सैद, ग्रामविकास अधिकारी मनोज भुजबळ व ग्रामस्थांनी वनाधिकाऱ्यांना भेटून पिंजरा लावण्याची मागणी केली होती, परंतु अद्याप कार्यवाही झाली नाही.

बिबट्याकडून होत असलेल्या हल्ल्यांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. माणसांवरदेखील बिबट्याचे हल्ले होण्याचा धोका आहे. याबाबत वन खात्याकडे अनेकदा बिबट्याला पकडण्यासाठी पत्रव्यवहार केला. परंतु, ‘पिंजरा आणण्यासाठी ट्रॅक्‍टर किंवा अन्य वाहन उपलब्ध करून द्या, तरच पिंजरा लावण्यात येईल,’ असे वन खात्याचे अधिकारी सांगतात. घटनास्थळी येऊन पंचनामे करून आश्‍वासने देऊन निघून जातात. परंतु, पिंजरा लावण्याची कार्यवाही करत नाहीत. येत्या एक ते दोन दिवसांत पिंजरा न लावल्यास आंदोलन केले जाईल, 
 - प्रशांत सैद, उपाध्यक्ष, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT