Leopard Cage
Leopard Cage sakal
पुणे

Otur Leopard: नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने लावले सहा पिंजरे

पराग जगताप

ओतूर वनविभागाकडून रविवारी रात्री बिबट्याच्या हल्यात बारा वर्षीय परप्रांतीय मुलगा ठार झाला.

ओतूर - ओतूर, ता. जुन्नर येथे नरभक्षक बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने या परीसरात सहा पिंजरे लावले असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकार वैभव काकडे यांनी दिली.

ओतूर वनविभागाकडून रविवारी रात्री बिबट्याच्या हल्यात बारा वर्षीय परप्रांतीय मुलगा ठार झाला. याच पाश्र्वभूमीवर वनविभागाकडून सोमवारी या परीसरातील कोळमळा येथे एक पिंजरा, वाकमळा येथे दोन पिंजरे व नदीपलीकडील जाकमाथा येथे तीन पिंजरे असे एकूण सहा पिंजरे या परीसरात नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाकडून लावण्यात आले आहे.

गेल्या काही महिन्यापासून ओतूर व परीसरात बिबट्याची दहशत पसरली असून, प्रत्येक महिन्यात बिबट्याचा मानवाशी संघर्ष होत आहे. बिबट्याचे मानवावरील हल्ले ही या परीसरात चिंतेची बाब बनली आहे.

या वर्षीच्या कांदे काढणी हंगामात मध्यप्रदेश येथील शेतमजूर कांदे काढणीसाठी ओतूर परीसरात आले. बिबट्याचा हा या परप्रांतीय शेतमजूराच्या कुटुंबावर दुसरा हल्ला असून, १५ मार्च रोजी बिबट्याने ओतूर येथील उंब्रज पांध शिवारात परप्रांतीय महिलेला गंभीर जखमी केले होते. तिचे नशीब बलवत्तर म्हणून तीचा जीव वाचला. मात्र, रविवारच्या घटनेतील परप्रांतीय मुलगा हा दुर्दैवी ठरला असून, त्याचा या बिबट्याच्या हल्यात दुर्दैवी अंत झाला आहे. हिच परीस्थिती मेंढपाळाची असून फेब्रुवारी मध्ये मेंढपाळ महिला ही बिबट्यांच्या हल्यात जखमी झाली होती.

याबाबत ओतूर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे म्हणाले की, शेतीकामसाठी बाहेर राज्यातून आलेल्या मजूराची राहण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी सुरक्षित ठीकाणी व्यवस्था करावी. तसेच ते राहत असलेल्या ठिकाणी रात्रभर प्रकाश करावा. लहान मुलाना रात्रीच्या वेळी बाहेर एकटे सोडू नये. रविवारी घडलेल्या दुर्दैवी घटनेतील पिडीत कुटुंबाला शासन नियमानुसार वीस लाख रूपये आर्थिक मदत दिली जाईल. तसेच वनविभागाकडून परप्रांतीय शेतमजूर व मेंढपाळानी शेतात उघड्यावर झोपू नये तसेच उंच जागेवर झोपावे. असे आवाहन करण्यात आले आहे. मानव बिबट यांच्यात संघर्ष होऊ नये म्हणून वनविभाग राबवत असलेली जनजागृती मोहीम अधिक प्रभावी पणे राबवणार आहे. या नरभक्षक बिबट्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी सहा पिंजरे या भागात लावण्यात असल्याची माहिती काकडे यांनी दिली.

आंबेगव्हाण येथील बिबट सफारी प्रतीक्षेत

जुन्नर तालुक्यातील बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर असून संपूर्ण तालुकाच बिबट्याचे घर झाले असल्याचे दिसून येते. तरी सरकारकडून आंबेगव्हाण येथे प्रस्तावित बिबट सफारी कधी होणार असा प्रश्न जुन्नर तालुक्यातील जनतेला पडला आहे. बिबट सफारी झाल्यानंतर तरी बिबट व मानव संघर्ष थांबेल किंवा कमी होईल अशी आशा नागरीकांना वाटते. तरी जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण येथे प्रस्तावित असलेली बिबट सफारी लवकरात लवकर उभारावी त्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन प्रयत्न करावे अशी मागणी जुन्नर तालुक्यातील नागरीकांकडून होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

SCROLL FOR NEXT