leopard sakal
पुणे

Pune News : ओतूर येथील कोळमळा येथे बिबट्या जेरबंद; हल्ल्या नंतर आठ दिवसात दुसरा बिबट्या जेरबंद

नरभक्षक जातीचा बिबट्या जेरबंद

पराग जगताप

ओतूर : जुन्नर येथील कोळमळा येथे वनविभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजर्‍यात सोमवारी पहाटे बिबट्या जेरबंद झाला असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकार वैभव काकडे यांनी दिली. मागच्या आठवड्यात ओतूर येथील जाकमाथा परीसरात बिबट्याच्या हल्यात बारा वर्षीय परप्रांतीय मुलगा ठार झाल्याच्या पाश्र्वभूमीवर वनविभागाकडून या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी याभागात सहा पिंजरे लावण्यात आले होते.

पैकी मागच्या सोमवारी पहाटे पुर्ण वाढ झालेला नरभक्षक जातीचा बिबट्या जेरबंद झाला होता.त्यानतंर सोमवार ता.२४ रोजी पहाटे पाच वाजे दरम्यान याच पिंजर्‍या पैकी कोळमळा परीसरात लावलेल्या पिंजर्‍यात बिबट्या जेरबंद झाला.

सदर जेरबंद बिबट्याला ओतूर चे वनपरिक्षेत्र अधिकार वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल रुपाली जगताप,वनरक्षक पी.के.खोकले वनकर्मचारी किसन केदार , गंगाराम जाधव,फुलचंद खंडागळे, जयराम जाधव इत्यादींनी या बिबट्यास सुखरूप माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रात दाखल केले. सदर बिबट्या हा मादी असून अंदाजे एक ते दोन वर्षाचा असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई-ठाणे मेट्रोसह 'या' ९ मार्गांना सुपरस्पीड मिळणार! राज्य सरकारचा मोठा निर्णय; कनेक्टिव्हिटीचं नवं युग सुरू होणार

Vaibhav Suryavanshi चे आणखी दोन मोठे विक्रम! १२ वर्षांपूर्वीचा मोडला विक्रम, बनला जगातील पहिला खेळाडू ज्याने...

Apple on Sanchar Saathi App : ‘अ‍ॅपल’ने सरकारच्या ‘Sanchar Saathi APP’ 'प्रीलोड'बाबत अखेर स्पष्ट केली भूमिका!

Gautam Gambhir : रवी शास्त्री यांनी साधला गौतम गंभीरवर निशाणा; म्हणाले, त्याचा बचाव करणार नाही, कारण १०० टक्के चूक...

Latest Marathi News Live Update : मुक्ताईनगरात बोगस मतदार, आमदार चंद्रकांत पाटील यांचा संताप

SCROLL FOR NEXT