Leopard Cubs Sakal
पुणे

Leopard : अवघ्या सव्वा तासात तीन बिबट्याची पिल्ले आईच्या कुशीत

वीस ते पंचवीस दिवसाची तीन बिबट्याची पिल्ले वनविभागाला अवघ्या सव्वा तासात आईच्या कुशीत सोडण्यात आले यश.

नवनाथ भेके

निरगुडसर - शिंगवे (ता. आंबेगाव) येथील रोहिदास रंगु गोरडे यांच्या शेतातील ऊस तोडणी सुरू असताना, सापडलेली वीस ते पंचवीस दिवसाची तीन बिबट्याची पिल्ले वनविभागाला अवघ्या सव्वा तासात आईच्या कुशीत सोडण्यात यश आले. ही घटना शनिवार (ता. ३०) रोजी सकाळी घडली.

शिंगवे येथे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची ऊस तोडणी चालू असताना ऊसात बिबट्याची साधारण वीस ते पंचवीस दिवस वयाची तीन पिल्ले आढळली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारीसह रेस्क्यु टिम मेंबर व निसर्ग अभ्यासक दत्तात्रय माधवराव राजगुरव शिंगवे व कु. शारदा दत्तात्रय राजगुरव हे घटनास्थळी पोहचले. सापडलेली बिबट्याची पिल्ले ताब्यात घेऊन वजने घेतली, पिल्ले चांगली सूद्रूढ व तंदुरुस्त होती.

त्यानंतर सकाळी दहा वाजुन दहा मिनिटांनी कॅमेरा ट्रॅप लाऊन पिल्ले बिबट्याच्या मादीकडे सोपवण्याची तयारी केली. त्यावेळी शेजारच्या ऊसाच्या शेतातून बिबट्याचा गुरगुरण्याचा आवाज येत असल्याचे सांगितले. त्यानंतर ताबडतोब सर्व ऊसतोडणी कामगारांना ऊस तोडणी थांबवण्याची सुचना दिली.

साधारण एक तासाने अकरा वाजुन दहा मिनिटांनी मादी बिबट्या पहिले पिल्लू नेण्यासाठी आली व पाच दहा मिनीटांच्या अंतराने उरलेली दोन्ही पिल्ले बिबट्या मादीने सुरक्षीत ठिकाणी घेऊन गेली व सव्वा तासात बिबट्याची पिले सुरक्षीत मादीकडे पोहचली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महात्मा गांधींच्या पुतळ्याला भाजपची टोपी, हातात पक्षाचा झेंडा; NDAच्या शिबिरात नेत्यांचा प्रताप, काँग्रेसचा हल्लाबोल

Maharashtra Politics : ३२ टक्के राजकारणी घराणेशाहीचे प्रतिक; ‘एडीआर’च्या अहवालातील महाराष्ट्राची स्थिती

Pune News : पुण्यातील शेतकऱ्याच्या अनोख्या आंदोलनाची चर्चा; तीन वेळा आमरण उपोषण करूनही दखल नाही, आता थेट कारवरच...

IND vs PAK Asia Cup 2025: पहलगाम हल्ल्यानंतर युद्ध केलंत, तेही नीट केले नाही, मागे हटायला...; पाकिस्तानी खेळाडूचं वादग्रस्त विधान

Wholesale Inflation India : घाऊक महागाईचा दर वाढला! 4 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आकडेवारी, सामान्य जनतेला फटका

SCROLL FOR NEXT