Leopard sakal
पुणे

Leopard : बारामतीत तीन दिवस बिबट्याचा मुक्त संचार; काळजी घेण्याचे वनविभागाचे आवाहन

बारामती शहरातील मेडदपरिसरातील टोयाटो शोरुम मागील गटकळवस्तीवर तीन दिवस बिबटयाचा वावर आढळल्याने या परिसरातील ग्रामस्थात भीतीचे वातावरण आहे.

मिलिंद संगई

बारामती - शहरातील मेडदपरिसरातील टोयाटो शोरुम मागील गटकळवस्तीवर तीन दिवस बिबटयाचा वावर आढळल्याने या परिसरातील ग्रामस्थात भीतीचे वातावरण आहे. तीन दिवसांपूर्वी एका कुत्र्याची शिकार या बिबट्याने केलेली होती. सलग तीन दिवस शिकार खाण्यासाठी बिबटया गटकळवस्ती परिसरात येत असल्याची बाब पुढे आली आहे.

दरम्यान वनविभागाने या परिसरात फिरुन बिबटयाची शोधमोहिम हाती घेतली आहे. चार दिवस बारामती तालुक्यातील खांडज परिसरात देखील बिबट्याचा वावर असल्याची बाब वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर यांनी नमूद केली.

गटकळवस्तीनजिकच्या सर्व परिसरात वनविभागाच्या वतीने नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. युध्दपातळीवर बिबटयाची शोध मोहिम सुरु असून वनविभागाचे कर्मचारी चोवीस तास याच कामावर असल्याचे शुभांगी लोणकर यांनी सांगितले.

ग्रामस्थांनी बिबट्याने कुत्रे मारल्याची बाब वनविभागास कळविल्यानंतर कॅमेरे बसविण्यात आले. या कॅमे-यात बिबटयाने कुत्र्याची केलेली शिकार फस्त करण्यासाठी हजेरी लावल्याची बाब उघड झाली. त्या नंतर वनविभागाने हालचाली करत या भागातील लोकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

तीन दिवस बिबट्या दिसला असला तरी शनिवारी (ता. 17) बिबटया आढळलेला नसल्याने त्याने स्थलांतर केले असावे असा वनविभागाचा अंदाज आहे.

काळजी घ्यावी..

बिबटया वस्तीत घुसल्याने ग्रामस्थांनी पुरेशी काळजी घ्यावी असे आवाहन वनविभागाने केलेले आहे. शिकारीच्या उद्देशाने हा बिबटया नागरी वस्तीत घुसला असावा असा अंदाज आहे. लोकांनी पुरेशी काळजी घ्यावी असे शुभांगी लोणकर यांनी नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cabinet: गरिबांसाठी हक्काची घरे, शेतकऱ्यांनाही दिलासा; मंत्रिमंडळ बैठकीत १० मोठ्या निर्णयांची घोषणा

District Bank election:चुकीचे लोक नकोत, म्हणून स्वाभिमान बाजूला ;डॉ. सुजय विखे पाटील ; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शेतकऱ्याचे हित महत्त्वाचे

Central Railway: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर ७५ दिवसांचा विशेष ब्लॉक, मेल/एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल

Marathi News Live Updates: आंबेगाव तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतुकीवर धडक कारवाई; सात हायवा जप्त

Retirement Planning: रिटायरमेंटनंतर आरामात जगण्यासाठी 1.5 कोटी पुरेसे नाही? HDFC पेन्शनच्या अहवालातून मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT