leopard killed in pune nashik highway accident forest department narayangaon esakal
पुणे

Pune Leopard Accident : वाहनाची धडक बसून नर बिबट्याचा मृत्यू: पुणे नाशिक महामार्गावरील घटना

मृत्यू झालेला बिबट्या अंदाजे वय आठ ते नऊ वर्ष वयाचा आहे

रवींद्र पाटे

नारायणगाव : येथील पुणे - नाशिक महामार्गावर श्री साई बालाजी हॉटेल जवळ अज्ञात वाहनाची धडक बसून नर जातीचा बिबट्याचा मृत्यू झाला. आज सायंकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली.

मृत्यू झालेला बिबट्या अंदाजे वय आठ ते नऊ वर्ष वयाचा आहे. अशी माहिती आपदा मित्र सुशांत भुजबळ यांनी दिली. वाहनाची धडक बसून बिबट्याचे पाय व डोके या अवयावांना दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

घटनास्थळी रेस्क्यू टीम सदस्य किरण वाजगे, माजी उपसरपंच संतोष वाजगे,सुजित खैरे,पोलीस पाटील तथा आपदा मित्र सुशांत भुजबळ,ग्राम सुरक्षा दलातील जवान हर्ष भास्कर,पुष्कराज तांबे,आदित्य डेरे, सिद्धेश ढवळे,निखिल जगताप, अजय दरंदळे,अमन चौधरी, विपुल कोल्हे,दर्पण पवार,

वन कर्मचारी खंडू भुजबळतातडीने दाखल झाले. वनपाल अनिता होले यांच्या सूचनेनुसार त्यांनी मृत बिबट्याला गाडीत टाकून शवाविच्छेदन करण्यासाठी माणिकडोह येथील निवारा केंद्र हालवले. पुणे नाशिक महामार्गावर वन्य प्राण्यांच्या मृत्यूच्या घटना वाढले आहेत.

नारायणगाव ते 14 नंबर दरम्यान मागील एक वर्षात दोन कोल्हे, एक तरस, पाच बिबट्यांचा मृत्यू झाला आहे.या भागातून मीनापूरक, डिंभेडावा कालवा, मीना नदी आहे. तसेच या भागात बागायती ऊस शेती मोठ्या प्रमाणात आहे.

रात्रीच्या वेळी पाणी व भक्षाच्या शोधात बिबटे व इतर वन्य प्राणी पुणे नाशिक महामार्ग ओलांडत असताना वाहनाच्या धडकेने मृत्युमुखी पडतात. घटना वारंवार घडत असून देखील वनविभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT