Leopard 
पुणे

बाप रे, कुत्रा समजून दगड मारला...पाहिले तर बिबट्या... 

राजेंद्र मारणे

 भुकूम (पुणे) : मुळशी तालुक्यातील रिहे येथील शेडगेवाडीत मंगळवारी रात्री बिबट्या आढळला. ग्रामस्थांनी फटाके वाजवून व आरडोओरडा करून त्यास पळवून लावले. येथे वनखात्याने पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

रिहे येथील अनिता सुरेश मोरे यांच्या घराबाहेर शेळ्यांचा गोठा आहे. तसेच, तेथे कोंबड्याही ठेवलल्या जातात. मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास त्या घराबाहेर आल्या. त्यावेळी कुत्रे असावे म्हणून आवज देत दगड मारला, पण त्याने काहीच हालचाल केली नाही. त्यामुळे त्यांनी दुसरा दगड मारल्यावर बिबट्या दिसला. त्यामुळे त्या मोठ्याने ओरडल्या. घरातील व आजूबाजूचे ग्रामस्थ आल्याने बिबट्या बांधावरून पळाल्याचे सर्वांनी पाहिले. तसेच, रात्री दहा वाजता बिबट्या पुन्हा आल्याने ग्रामस्थांनी फटाके वाजवून त्यास पळवून लावले. बिबट्याच्या दर्शनाने रिहे गाव आणि  येथील बोडकेवाडी, खेंगरेवाडी, मोरेवाडी ग्रामस्थांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. 

याबाबत माजी सरपंच अनिल मोरे,  केशव पडळघरे यांनी सांगितले की, रिहे गावाच्या वाड्या डोंगरावर वसलेल्या आहेत. येथील डोंगराच्या पलिकडे कासारसाई गाव असून, तेथे नेहमी बिबट्या दिसला आहे. त्यामुळे तो येथे येणे शक्य आहे. वनआधिकारी रावसाहेब चौरे यांनी ठसे पाहून बिबट्याच असल्याचे सांगितले. 

रिहे परिसरात पोल्ट्री मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांच्या व कुत्र्यांमुळे बिबट्या येथे येऊ शकतो. तसेच, पाऊस येऊन गेल्यामुळे डोंगरावर झुडपे मोठ्या प्रमाणावर वाढली असून, बिबट्या त्याचा फायदा बिबट्या घेऊन कधीही हल्ला करू शकतो. त्यासाठी काळजी घ्यावी.  ग्रामस्थांनी रात्री बाहेर पडू नये. सापळा लवकरच लावण्यात येईल, असे चौरे यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
  
दरम्यान, मुळशी तालुक्यात रिहे गावाजवळ मुलखेड येथे यापूर्वी बिबट्याला सापळा लावून पकडण्यात आले होते. तसेच, मुगावडे, चाले गावातही या पूर्वी बिबट्याचे दर्शन झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईकरांसाठी बीएमसीची दिवाळी भेट! ४२६ सदनिकांच्या विक्री प्रक्रियेला सुरूवात होणार? अर्ज कधी आणि कुठे करायचा?

Tejas MK 1A: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड इतिहास घडवणार! तेजस एमके १ए लढाऊ विमान उड्डाणासाठी सज्ज, पण नाशिकमधून उड्डाण का?

Erotic Content : आंबट शौकिनासाठी AI ची गुड न्यूज! अडल्ट कंटेंटही तयार करून देणार ChatGPT, कंपनीची मोठी घोषणा, कसं वापरायचं? पाहा

Electric car caught fire Video : भररस्त्यात पेटली इलेक्ट्रिक SUV कार; दरवाजे झाले लॉक अन् ड्रायव्हर जिवंत जळाला!

सायन रुग्णालयात नोव्हेंबरपासून बोन मॅरो प्रत्यारोपणासाठी विस्तारित केंद्र सुरू, प्रत्यारोपण क्षमता वाढणार

SCROLL FOR NEXT