Leopard sakal
पुणे

Leopard : गलांडवाडी येथे बिबट्या जेरबंद

गलांडवाडी (ता. दौंड) येथे मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याला पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्यास वन विभागाला यश आले.

प्रा. संतोष काळे

गलांडवाडी (ता. दौंड) येथे मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याला पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्यास वन विभागाला यश आले.

राहू - गलांडवाडी (ता. दौंड) येथे मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याला पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्यास वन विभागाला यश आले. गलांडवाडी परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने येथील अनेक पाळीव प्राणी त्यांनी फस्त केले होते. तसेच नागरिकांमध्ये सुद्धा भीतीचे वातावरण होते. वनविभागाने बिबट्याला ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी करून बिबट्या निवारण केंद्रात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाच्या वतीने देण्यात आली.

दौंड तालुक्यातील नदी पट्टयातुन बिबट्याचा वावर शेतकऱ्यांच्या शेतात वाढला आहे, वन विभागाकडून देखील या बिबट्याना पकडण्यासाठी शर्थीने प्रयत्न सुरू केले असून गलांडवाडीतील शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. मौजे गलांडवाडी, खुटबाव, एकेरीवाडी या भागात धुमाकूळ घालणारे बिबट्याला जेर बंद करण्यास वन विभागाला अखेर यश आले आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी दौंड श्रीमती कल्याणी गोडसे, वनरक्षक सचिन पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली गलांडवाडी येथील कदम वस्तीवर पिंजरा लावून बिबट्यास अखेर जेरबंद केले . रेस्क्यू टीम पुणे व इको रेस्कॉट दौंड यांचे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. सदर बिबट्यास जेरबंद केल्यानंतर पुणे रेस्क्यू रेस्क्यू चॅरिटेबल पुणे या ठिकाणी येऊन सदर वन्य प्राण्यांची तपासणी करून त्यास नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.

उर्वरित बिबट्यांना पण जेरबंद करा...

ग्रामस्थांची वनविभागाकडे मागणी. दौंडच्या पश्चिम पट्ट्यात मुळा मुठा आणि भीमा नदीचे पात्र आहे. या परिसरात वन विभागाचे मोठे क्षेत्र आहे. तसेच उसासारखा बागायती पट्टा असल्याने बारमाही उसाचे पीक येथे असते त्यामुळे बिबट्या सदृश्य प्राण्यांना लपायला अधिक वाव मिळतो .उर्वरित बिबट्यांना पण तातडीने जेरबंद करण्यात यावी अशी मागणी यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Shortage in India : पुढील 3 महिने गॅस सिलिंडर मिळणं कठीण? छगन भुजबळ यांनी दिला धोक्याचा इशारा, पाहा काय आहे कारण?

Land Scheme: अतिक्रमणधारकांना मोठा दिलासा! गरीबांसाठी घराचा मार्ग मोकळा; महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

Latest Marathi News Live Update : आठ जुलैला होणार संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे पंढरपूरकडे प्रस्थान

इराणला नवा साथिदार! अमेरिकेला धुडकावून इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा; मध्यपूर्वेत युद्धाचा भडका, युद्ध आणखी तीव्र होणार?

एकतर्फी प्रेमातून आधी पाठलाग, नंतर रस्त्यात गाठलं अन्...; तरुणानं तरुणीसोबत नको ते केलं...

SCROLL FOR NEXT