पुणे

चला, सकारात्मक बनू!

सुवर्णा चव्हाण

पुणे - कौटुंबिक कलह, बेरोजगारी, प्रेमभंग, नात्यातील दुरावा, कुटुंबाकडून वाढलेला दबाव, आधुनिक जीवनशैली, वाढत्या अपेक्षा आणि नोकरीच्या ठिकाणी वाढता ताण... अशा विविध कारणांमुळे सध्याच्या तरुणांमध्ये तणाव वाढत आहे. कुठेतरी या ताणामुळे तरुणाचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक बनला आहे... नकारात्मकतेकडे झुकणाऱ्या तरुणाईला पुन्हा जीवनाकडे वळविण्यासाठी सकारात्मक पाऊले उचलताहेत मोटिवेशनल स्पीकर्स. तरुणच तरुणांसाठी मोटिवेशनल स्पीकर्स म्हणून काम करत आहेत. महाविद्यालय असो वा आयटी कंपन्या आठवड्यातून एक ते दोन वेळा होणाऱ्या मोटिवेशनल स्पीकर्सच्या कार्यशाळांमधून तरुणांना जीवनाचा नवा आणि स्वच्छंदी मार्ग मिळत आहे.

कौटुंबिक कलहातून कसे बाहेर पडता येईल इथपासून ते करिअरमध्ये नवी वाटा कशा शोधता येतील इथपर्यंत... तरुणांशी निगडित आणि तरुणाला भावतील अशा विषयांवर मनमोकळा संवाद साधण्याचे काम हे स्पीकर्स करत आहेत. महाविद्यालय, आयटी कंपनी आणि मुक्त कार्यक्रमांमध्ये मोटिवेशनल स्पीकर्सच्या कार्यशाळा घेण्यात येतात.  

आयटी कंपन्यांमध्येही मोटिवेशनल टॉक्‍स...
आयटी कंपन्यांकडूनही मोटिवेशनल टॉक्‍स कार्यशाळा घेण्यात येतात. यात मोटिवेशनल स्पीकर्स त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे प्रश्‍न जाणून घेऊन त्यांना ताणतणावातून बाहेर काढण्यासाठी मदत करत आहेत. 

आयटी कंपन्यांसाठी खास सहली...
कामाच्या ठिकाणी निर्माण होणारा ताण दूर व्हावा, सहकाऱ्यांमध्ये एकीची भावना निर्माण व्हावी आणि त्यांना व्यक्त होता यावे, यासाठी आउटडोअर मोटिवेशनल सहलींचे आयोजन केले जात आहेत. सात ते आठ दिवसांच्या या सहलींद्वारे विविध खेळ, गप्पा, गाण्यांच्या माध्यमातून आयटीतले तरुण आपल्या विविध विषयांवर चर्चा करू लागले आहेत.

सोशल मीडियाद्वारेही समुपदेशन
हे मोटिवेशनल स्पीकर्स फेसबुक पेज, इन्स्टाग्राम, व्हॉट्‌सॲप ग्रुप आणि यु-ट्यूब चॅनेल्सद्वारे तरुण-तरुणींचे समुपदेशन करण्याचे काम करत आहेत. त्याचा फायदा होत असून, तरुण -तरुणी आपले प्रश्‍न मांडू लागले आहेत. 

तरुणांचे मत परिवर्तन करण्यासाठी त्यांना सकारात्मक मार्ग दाखविण्याचे काम आम्ही करतो. ठिकठिकाणी असे सेशन्स आयोजित केले जात आहेत. या कार्यक्रमातून प्रत्येकाला काही ना काही सकारात्मक विचार मिळतोच. त्या-त्या वयोगटानुसार आणि विषयानुसार मोटिवेशनल कार्यशाळा घ्यावा लागतात. त्यांच्याशी संवाद साधत त्यांचे विषय जाणून घेऊन त्यांना मार्गदर्शन करावे लागते.
- स्फूर्ती सहारे, मोटिवेशनल स्पीकर्स

आयटीतील नोकरदारांमध्ये एकोपा निर्माण व्हावा आणि त्यांचा ताण कमी व्हावा, यासाठी या कार्यशाळा घेतल्या जातात आणि त्यांच्यासाठी खास सहलींचे आयोजन केले जात आहे. यातून त्यांच्या जीवनात एक सकारात्मक बदल होत आणि त्यांना व्यक्त होण्याचे माध्यम मिळत आहे.
- डॉ. राम गुडगिला, लाइफ कोच

आमच्या कंपनीमध्ये अशा मोटिवेशनल कार्यशाळा आयोजित केल्या जातात. त्याचा आम्हाला नक्कीच फायदा होतो. मनातील विचारांची वाट करून देऊन सकारात्मक विचार आत्मसात करण्याचे एक माध्यम मिळते.
- नीलेश देसाई, आयटीतील नोकरदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New ODI & Test Captain: मोठा नेतृत्वबदल! १४१ आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा खेळाडू झाला कर्णधार, अफगाणिस्तानची घोषणा

Nalasopara ST Buses: आषाढी एकादशीपूर्वी नालासोपारा आगारात ५ नवीन एसटी बसेस; आमदार राजन नाईक यांच्या पाठपुराव्याला यश, वसई-विरार प्रवाशांना दिलासा

Bridge Collapse : मुळा-मुठा नदीवरील नवीन उभारणी केलेला पूल किरकोळ पुरात कोसळला; चौकशीची मागणी

Roha ST Negligence: रोहा आगाराचा भोंगळ कारभार: मुसळधार पावसात बससाठी ताटकळलेल्या विद्यार्थिनी, पालकांचा संताप उसळला

Delhi Protest: ''दलितांना, शेतकऱ्यांना भडकावल्यानंतर आता विद्यार्थ्यांना चेतवलं जातंय'', दिल्ली आंदोलनावर योगी आदित्यनाथांचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT